Home /News /news /

खळबळजनक! माटूंगा स्टेशनवर प्रेयसीची हत्या करताना प्रियकराचाच झाला मृत्यू, नेमकं काय घडलं

खळबळजनक! माटूंगा स्टेशनवर प्रेयसीची हत्या करताना प्रियकराचाच झाला मृत्यू, नेमकं काय घडलं

पोलिसांनी या प्रकरणाचा जेव्हा अधिक तपास केला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.

    मुंबई, 04 फेब्रुवारी : प्रेयसीसोबत धुळ्याहून मुंबईमध्ये आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. पण पोलिसांनी या प्रकरणाचा जेव्हा अधिक तपास केला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीसोबत त्याची प्रेयसीदेखील रेल्वे स्थानकावर असल्याचं सीसीटीव्हीमध्ये समोर आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मृत व्यक्तीचे कुटुंब हे धुळ्याला राहते. महिलेची कर्जाच्या निमित्ताने मृत व्यक्तीशी ओळख झाली. कर्ज काढायचं आहे म्हणून महिला त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर त्यांच्यात अधिक ओळख वाढली आणि पुढे जवळीकही वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर मृत व्यक्तीने महिलेला अनेकवेळा पैशांची मदत केली. पण तिने कधीच पैसे परत केले नाही. जानेवारीतमध्ये 18 तारखेला दोघेही फिरण्यासाठी म्हणून धुळ्याहून मुंबईत आले. त्यांनी एकत्र वेळ घालवला. धुळ्यात जाणाऱ्या ट्रेनमध्ये तुला बसवून देतो असो म्हणत त्यांनी वांद्रातून माटूंग्यापर्यंत प्रवास केला. दादर टर्मिन्सहून ट्रेन पकडण्यासाठी आपण रुळावरुन चालत जाऊ असं प्रियकराने महिलेला सांगितलं. महिलेने प्रियकरावर विश्वास ठेवला. दोघेही प्लॅटफॉर्मवरुन एकत्र चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. इतर बातम्या - व्यंगचित्र का काढत नाहीत राज ठाकरे? पुण्याच्या कार्यक्रमात केला खुलासा दादर-माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळावर एका निर्जन टप्प्यावर आल्यानंतर त्याने महिलेला थांबवलं आणि लघूशंका करण्यासाठी गेला. महिला उभी असतानाच मागून आला आणि तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वत:ला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यानंतर तिच्या शरीराची हालचाल थांबली. तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात घेत व्यक्ती तिचं सामान घेऊन पळत सुटतो. पळण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रेनकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि यात धडकेमध्ये त्याचा मृत्यू होतो. व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येत महिला उठते आणि रेल्वे स्थानकाच्या दिशेने धाव घेते. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तीने मरणयाचं नाटक केलं असल्याची तिने पोलिसांनी सांगितलं. इतर बातम्या - वनडे मालिकेआधीच न्यूझीलंडला सर्वात मोठा झटका! कर्णधार केन विल्यम्सन संघाबाहेर रेल्वे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. व्यक्तीच्या हत्येमध्ये महिलेचा हात असल्याचा त्यांना संशय आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील वेगवेगळे कॅमेरे तपासले. पण त्यात महिलेविरुद्ध कोणतेही पुरावे हाती लागले नाही. पण कर्ज न फेडल्यामुळे त्याने महिलेला मारण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. इतर बातम्या - हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, प्राध्यापिकेच्या मेडिकल रिपोर्टमुळे चिंता वाढली
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या