'आम्ही डोळ्यासमोर पाहिला मृत्यू, रेड सिग्नल असल्यामुळे मोठा अपघात टळला'

'आम्ही डोळ्यासमोर पाहिला मृत्यू, रेड सिग्नल असल्यामुळे मोठा अपघात टळला'

रेड सिग्नल असल्यामुळे मी उभा होतो. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाल्याचं मी ऐकलं. त्यानंतर पाहिलं तर पुलाचा काही भाग कोसळला होता

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : मुंबईच्या सीएसएमटीजवळी पादचारी पूल कोसळला आहे. या पूल दुर्घटनेमध्ये 34 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर 3 जणांचा या मृत्यू झाला आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सीएसटी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी होती. हा पादचारी पूल टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिससमोर उतरतो.

घटनास्थळावर उपस्थित जितेंंद्र या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, 'संध्याकाळी मी याच परिसरातून घरी चाललो होतो. रेड सिग्नल असल्यामुळे मी उभा होतो. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाल्याचं मी ऐकलं. त्यानंतर पाहिलं तर पुलाचा काही भाग कोसळला होता आणि खूप आरडाओरड सुरू झाली. क्षणभर काय झालं हे मला समजलंच नाही. खरंतर रेड सिग्रल असल्यामुळे मोठा अपघात टळला. मी पाहिलं तेव्हा एक टॅक्सी पुलाखालून जात होती. नेमका त्याच्या टॅक्सीच्या पुढच्या भागावर पुलाचा काही भाग कोसळला. त्याच्या गाडीचा पुढचा भाग ढिगाऱ्याखालीच गेला होता. त्यानंतर मी घटनास्थळी धाव घेतली. तर एका ठिकाणी मी एका व्यक्तीचा मृतदेह पाहिला. तोपर्यंत इतर प्रवाशांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झालं. अनेक जखमींना नजिकच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता मिळालेल्या माहितीनुसार, या पूल अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. '

मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

नेमका काय प्रकार घडला?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 37 जण जखमी झाले आहेत. अात्ता हाती आलेल्या बातमीनुसार, झाहीद खान, अपूर्वा प्रभू (वय 35 ) आणि रंजना तांबे (वय 40) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना असू शकेल, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

सीएसएमटीकडून टाईम्स आॅफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. जखमींवर सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत. मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो.

या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले.जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे.

मुंबईत पूल कोसळला, घटनास्थळावरचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CSTmumbai
First Published: Mar 14, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या