S M L

मीरा रोडच्या 'बॉलिवूड कॉम्लेक्स'ला तडे, रात्रीत खाली केले 90 फ्लॅट

मुंबईच्या मीरा रोडमध्ये असलेल्या ग्रीन वुड कॉम्प्लेक्सच्या इमारतींनी तडे गेल्यामुळे आजुबाजुच्या 4 इमारतींना सुरक्षेच्या दृष्टीने खाली करण्यात आल्या आहेत.

Updated On: Aug 29, 2018 09:29 AM IST

मीरा रोडच्या 'बॉलिवूड कॉम्लेक्स'ला तडे, रात्रीत खाली केले 90 फ्लॅट

मुंबई, 29 ऑगस्ट : मुंबईच्या मीरा रोडमध्ये असलेल्या ग्रीन वुड कॉम्प्लेक्सच्या इमारतींनी तडे गेल्यामुळे आजुबाजुच्या 4 इमारतींना सुरक्षेच्या दृष्टीने खाली करण्यात आल्या आहेत. या सगळ्याच इमारती इतिहासकालीन आहेत. त्यामुळे इमारतींच्या भींती जीर्ण झाल्या आहेत. इमारतीला मोठे तडे गेले आहेत. येथील रहिवाश्यांच्य़ा सुरक्षेचा विचार करता इतर 4 इमारती रिकाम्या करण्यात आल्य़ा आहेत. या इमारतींमध्ये एकूण 95 पेक्षा जास्त रहिवाशी राहतात त्याच बरोबर एकूण 90 फ्लॅट या इमारतीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या कॉम्प्लेक्समध्ये अमिताभ, माधूरी अमन, शाहरुख अशा नावांच्या इमारती आहेत. इमारतींना सिनेकलाकारांची नाव असल्यामुळे या परिसराला बॉलिवूड कॉम्प्लेक्सही म्हणतात. पण सध्या आता हे संपूर्ण बॉलिवूड कॉम्पेक्स रिकामं करण्यात आलं आहे.  अचानक इमारती खाली करण्यास सांगितल्याने रहिवाश्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

काहींनी इतर कुटुंबियांचा सहारा घेतला आहे तर अनेक रहिवाश्यांचा निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही रहिवाशी तर रात्रभर बेघर झाले होते. अशा वेळी प्रशासनाने त्यांची व्यवस्था तात्पुरती संक्रमण शिबिरात केली आहे.अनेक वेळा इमारतीच्या डागडुजीसाठी तक्रार करूनही महापालिकेकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचं रहिवाश्यांकडून सांगण्यात येत आहे. काल रात्री 3:30 वाजताच्या सुमारास रहिवाश्यांच्या लक्षात आलं की इमारत एका बाजूला कलतेय त्यामुळे रहिवाश्यांनी तात्काळ इमारत रिकामी केली.

 

PHOTOS : 'ज्या' वास्तूमुळे घडला तुरुंगवास,तो पाहुन भुजबळ झाले भावूक

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 09:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close