Home /News /news /

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 22% टक्क्यांहून कमी झाले अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 22% टक्क्यांहून कमी झाले अॅक्टिव्ह रुग्ण

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची अॅक्टिव्ह प्रकरणं ही 22 टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचं म्हटलं आहे. आश्विनी या सध्या मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आहेत.

    मुंबई, 25 जुलै : महाराष्ट्रा सरकारचे (Maharashtra Government) पर्यावरण मंत्री (Environment Minister) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) मध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) अॅक्टिव्ह प्रकरणं (Active Cases) 22% होती. पण त्यावर अधिक माहिती देत आश्विनी भिडे यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची अॅक्टिव्ह प्रकरणं ही 22 टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचं म्हटलं आहे. आश्विनी या सध्या मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. दरम्यान, शनिवारीही राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी 9251 रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या 8 ते 10 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज 257 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 366368 एवढी झाली आहे. तर 13389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत 1080 रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या 108060 एवढी झाली आहे. तर आज 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 7 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 55.56 एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Union Ministry of Health याविषयीची माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी Covide-19 टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली असल्याचं सांगण्यात येत आहे. ही संख्या वाढविल्यामुळेच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जेवढ्या जास्त टेस्ट होतील तेवढी संख्या वाढेल असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. देशात सुरुवातीच्या महिन्यांमध्ये फक्त 1 प्रयोगशाळा होती सध्या देशात 1,301 कोरोनाच्या टेस्ट लॅब आहेत. शुक्रवारपर्यंत 1,58,49,068 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 4,20,898 टेस्ट करण्यात आल्यात.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या