Home /News /news /

फक्त घरी बसून कामं होत नाही, मनसे नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

फक्त घरी बसून कामं होत नाही, मनसे नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्य सरकारने पुरेशी काळजी न घेतल्याने मुंबईने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनला मागे टाकले आहे.

मुंबई, 07 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे 'फक्त घरी बसून कामं होत नाही, त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात',असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत्या संख्येला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकारने पुरेशी काळजी न घेतल्याने मुंबईने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनला मागे टाकले आहे. फक्त घरी बसून काम होत नाही, त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात, असा टोला देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. शेतकऱ्याने लावला सीसीटीव्ही कॅमेरा,गोठ्यात जे दिसले ते पाहून झाला हैराण तसंच, 'अंतिम वर्ष परीक्षेबद्दल राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांनी घोळ घातला आहे. आता त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. परीक्षा घ्यायचीच होती तर आधी घ्यायला हवी होती. आधी निर्णय रद्द केला आणि आता यूजीसीनेच परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे' अशी टीकाही देशपांडेंनी केली. 'महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वांद्रे ते दादर असा इतकाच प्रवास केल्यानंतर प्रश्न सुटणार कसे?' असा सवाल उपस्थितीत करत देशपांडेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली. आशिष शेलारांचेही राज्य सरकारवर टीकास्त्र दरम्यान, दुसरीकडे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारला टोला लगावला आहे. 'देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने “एकसूत्री”निर्णय घेतला. शैक्षणिक आरोग्या सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करुन सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये' असा सल्लावजा टोला शेलारांनी राज्य सरकारला लगावला. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी, 'हे' होते बैठकीतील मुद्दे तसंच, 'मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले.' असंही शेलार म्हणाले. 'राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा. आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा', अशी मागणीही शेलारांनी केली. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: MNS, Sandeep deshpande, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, मनसे, शिवसेना

पुढील बातम्या