मुंबईकरांना स्थानकावर मिळणार नाही लिंबू सरबत, रेल्वे प्रशासनाचा निर्णय!

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन आता प्रशासनाने स्थानकांवरील लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टा यांच्या खुल्या विक्रीवर बंदी घातली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 09:15 AM IST

मुंबईकरांना स्थानकावर मिळणार नाही लिंबू सरबत, रेल्वे प्रशासनाचा निर्णय!

मुंबई, 27 मार्च: कुर्ला रेल्वे स्थानकावर लिंबू सरबतासाठी थेट टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँकमधून पाणी घेऊन त्यापासून सरबत बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन आता प्रशासनाने स्थानकांवरील लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टा यांच्या खुल्या विक्रीवर बंदी घातली आहे.

दोनच दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 7 आणि 8 च्या मध्यभागी लिंबू सरबतवाला थेट टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँकमधून पाणी घेऊन त्यापासून सरबत बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने संबंधीत स्टॉल बंद करण्याचे आदेश दिले होता. आता सर्वच स्थानकातील लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टा आदीच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने 2013मध्ये स्थानकांवर ज्यूस विकण्याची पवानगी दिली होती. मात्र कुर्ला स्थानकावरील प्रकार समोर आल्यानंतर ज्युसचा दर्जा चांगला नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने ज्युस विक्रीवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले आहे.

लिंबू सरबत पिण्याआधी 'हा' VIDEO एकदा पाहाच


Loading...


VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...