#MumbaiBridgeCollapse: पप्पा कधीच नाही येणार घरी, 2 लहान मुलं झाली पोरकी

#MumbaiBridgeCollapse: पप्पा कधीच नाही येणार घरी, 2 लहान मुलं झाली पोरकी

झाहीद यांचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ बेल्ट विकण्याचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे झाहीद आणि त्यांचे वडिल सिराज खान हे क्रॉफर्ड मार्केट इथे व्यवसायाचं सामान आणण्यास गेले होते.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 37 जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात घाटकोपरच्या नित्यानंद नगर विभागात रहाणारे 32 वर्षीय झाहीद सिराज खान यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

झाहीद  यांचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ बेल्ट विकण्याचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे झाहीद  आणि त्यांचे वडिल सिराज खान हे क्रॉफर्ड मार्केट इथे व्यवसायाचं  सामान आणण्यास गेले होते. याच वेळी हा अपघात झाला आणि त्यात झाहीद  यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील सिराज खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झाहीद यांना दोन लहान मुलं असून त्यांच्या अश्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबच पोरकं झालं आहे. तर यावर परिसरातून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामध्ये मृतांची संख्या 5वर गेली आहे. यात झाहीद खान (वय 32), तपेंद्र सिंग (वय 35), अपूर्वा प्रभू (वय 35 ) आणि रंजना तांबे (वय 40), सारिका कुलकर्णी ( वय 35) अशी मृतांची नावं आहेत.

#MumbaiBridgeCollapse घटनेच्या चौकशीचे आदेश, दोषींना शिक्षा करणार - मुख्यमंत्री

नेमका काय प्रकार घडला?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 37 जण जखमी झाले आहेत. अात्ता हाती आलेल्या बातमीनुसार, झाहीद खान, अपूर्वा प्रभू (वय 35 ) आणि रंजना तांबे (वय 40) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना असू शकेल, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

सीएसएमटीकडून टाईम्स आॅफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. जखमींवर सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत. मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो.

या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले.जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे.

VIDEO : काय घडलं नेमकं? ज्या टॅक्सीवर कोसळला पूल चालक म्हणतो...

 

First published: March 14, 2019, 11:11 PM IST

ताज्या बातम्या