मोठी बातमी : मुंबई, पुण्यासह 8 महापालिकांचं महापौरपद आता खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी

मोठी बातमी : मुंबई, पुण्यासह 8 महापालिकांचं महापौरपद आता खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी

महापालिकांच्या महापौरपदांसाठीच्या आरक्षणासंदर्भातली लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या महापालिकांचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असेल.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : महापालिकांच्या महापौरपदांसाठीच्या आरक्षणासंदर्भातली लॉटरी काढण्यात आली असून यापुढच्या निवडणुकांमध्ये कुठल्या महापालिकांना महापौरपद आरक्षित असेल आणि कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे या लॉटरीच्या निकालामुळे निश्चित झालं आहे. महापौरपदासाठीच्या आरक्षणाच्या सोडतीत मुंबईसाठी मोठी बातमी आली आहे.  आता मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी  (open) असेल. मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या महापालिका ओपन कॅटेगरीसाठी खुल्या झाल्या आहेत.

नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका  खुल्या गटातील महिलांसाठी राखीव असेल. वेगवेगळ्या महापालिकांचे महापौरपदांच्या आरक्षणाचा निर्णय लॉटरी पद्धतीने होतो. कुठली महापालिका कुठल्या प्रवर्गासाठी खुली किंवा आरक्षित आहे याचा निकाल या ताज्या लॉटरीने लागला आहे.

महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीचे निकाल खालीलप्रमाणे

ओपन ( खुला) महिला

- चंद्रपूर

- नवी मुंबई

- जळगाव

- भिवंडी

- अकोला

-पनवेल

- पिंपरी चिंचवड

- औरंगाबाद

ओपन ( खुला प्रवर्ग)

-  मुंबई

- पुणे

- नागपूर

- ठाणे

- नाशिक

-कल्याण डोबिंवली

- सांगली

- उल्हास नगर

-------------------

अन्य बातम्या

धक्कादायक VIDEO! शाळेत अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करताना मुलगी दुसऱ्या मजल्यावरून पडली

भाजपला हवा 'षटकार' अन्यथा आणखी एक राज्य गमवावे लागेल!

'राष्ट्रवादीसोबत हात मिळवू नका', शिवसेना कार्यकर्त्याचं टॉवरवर चढून आंदोलन

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 13, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading