• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • दाऊदचा हस्तक 'फारुक टकला'ला अटक; गुरूवारी आणलं मुंबईत

दाऊदचा हस्तक 'फारुक टकला'ला अटक; गुरूवारी आणलं मुंबईत

1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि दाऊदचा जवळचा असलेले फारुक टकला याला सीबीआयने दुबईत अटक केली आहे.

  • Share this:
08 मार्च : 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि दाऊदचा जवळचा असलेले फारुक टकला याला सीबीआयने दुबईत अटक केली आहे. गुरुवारी त्याला मुंबईत आणण्यात आलं आहे. गुरुवारी (8 मार्च) सकाळी एअर इंडियाच्या विमानानं फारुकला मुंबईत आणण्यात आले. यानंतर त्याला टाडा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. फारुकला दाऊद इब्राहिमच्या उजवा हात समजलं जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सीबीआयला फारुककडून अनेक महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. फारुकच्या मदतीने सीबीआय दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांसंबंधित माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईतून दुबईला पळाला होता. 1993 बॉम्बस्फोटानंतर 1995मध्ये फारुकविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. फारुख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्वासू साथीदारांपैकी तो एक होता. 1993च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचा देखील सहभाग होता.  
First published: