मुंबई, 30 ऑगस्ट : मुंबईत ब्लॅकमेलींगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील एका 25 वर्षीय युवकाला ब्लॅकमेल करून तब्बल 37 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सगळ्यात आधी अज्ञात महिलेने सापळा रचून तरुणाचा नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी वसूल केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही घटना मुंबई लगतच्या भाईंदर भागातील आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपवर एका युवकाला अज्ञात नंबरहून महिलेचा फोन आला होता. यानंतर, तरूण आणि महिलेमध्ये बोलणं सुरू झालं. एकदा महिलेने युवकाला फोन करून थेट नग्न होण्याची मागणी केली. त्यानंतर तिने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याच्याकडे थेट 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.
VIDEO: 'मी मरेन, नाहीतर मारेन पण कोरोना चाचणी करणार नाही'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा 25 वर्षांचा असून तो एका खासगी कंपनीत काम करतो. हा सगळा प्रकार झाल्यानंतर तरुणाला थेट धमकीचा फोन आला आणि 50 हजारांची रक्कम मागितली गेली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी त्याला देण्यात आली. तर यावेळी कॉलरने स्वतःला सीबीआय एजंट असल्याचं माहिती दिली.
आई-मावशीमुळे तरुणीवर झाला बलात्कार, किडनी स्टोनसाठी तांत्रिकाकडे नेलं आणि...
आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी
राज्यात सध्या कोरोनाचं संकट आहे. अशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे युवक घरून काम करत होता. यामध्ये त्याला 50 हजार देणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याने 37 हजार रुपये देण्याचं सांगितले. यानंतर डिजिटलाइज्ड रक्कम महिलेने दिलेल्या नंबरवर पाठवण्यात आली. हा सगळा धक्कादायक प्रकार लक्षात येताच युवकाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली आहे. जिथे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपास सरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.