ठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक !

ठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक !

  • Share this:

मुंबई, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे एकच खळबळ उडाली आहे. भय्यूजी महाराज यांचा सर्वच राजकीय पक्षांसोबत संपर्क होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही भय्यूजी महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही भय्यूजींच्या संपर्कात होते.

2008 मध्ये भय्यूजी महाराज हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव हे नियमित भय्यूजी महाराजांना भेटत होते. ज्या ज्या वेळी भय्यूजी महाराज हे मुंबईत आले त्या त्या वेळी त्यांची 'मातोश्री'वर भेट हमखास होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं तेव्हा भय्यूजी महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच बाळासाहेबांवर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. या दुखाच्या प्रसंगीत भय्यूजी महाराज ठाकरे कुटुंबियांसोबत होते.

तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही भय्यूजी महाराज यांच्यासोबत चांगले संबंध होते. राज ठाकरे यांचा गेल्या काही वर्षांपासून भय्यूजी महाराज यांच्यासोबत संपर्क वाढला होता.

संकटमोचक भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज यांची संकटमोचक म्हणून राजकारणात ओळख होती. 2011 मध्ये भय्यूजी महाराजांनी अण्णा हजारे यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी मध्यस्थी केली होती.

मोहन भागवत आणि भय्यूजी महाराज यांचे संबंध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत भय्यूजी महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. जवळपास सर्वच राजकीय पक्षांसोबत त्यांचा संपर्क होता. त्यांच्या या अकाली निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधीत बातम्या

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

फोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

First published: June 12, 2018, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading