माहिम सूटकेस हत्याकांडात आधार कार्डामुळे नवं ट्वीस्ट, आरोपी लेकीबद्दल धक्कादायक खुलासा

माहिम सूटकेस हत्याकांडात आधार कार्डामुळे नवं ट्वीस्ट, आरोपी लेकीबद्दल धक्कादायक खुलासा

59 वर्षीय बेनेट रिबेलो यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणजे त्यांची मुलगी ही अल्पवयीन आहे. तिचं वय 19 वर्ष असल्याचं सांगण्यात येत होतं पण ते ती 19 नसून अवघ्या 17 वर्षांची असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

माहिम, 16 डिसेंबर : माहिम सूटकेस हत्याकांडात मुंबई क्राईम ब्रांचने एक धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय बेनेट रिबेलो यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणजे त्यांची मुलगी ही अल्पवयीन आहे. तिचं वय 19 वर्ष असल्याचं सांगण्यात येत होतं पण ते ती 19 नसून अवघ्या 17 वर्षांची असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डनुसार 21 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला होता. त्यानुसार तिचे वय 17 वर्षे सहा महिने आहे. रविवारी स्थानिक कोर्टाने पोलिसांना ते जुवेनाइल न्याय मंडळासमोर हजर करण्यास सांगितलं. तिचे वय निश्चित करण्यासाठी तिचे वैद्यकीय तपासणी करण्याचा विचार पोलीस करीत आहेत.

मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले होते. प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली आहे.

इतर बातम्या - कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

काय आहे प्रकरण?

मुंबईतील एक पंचतारांकीत हॉटेलमध्ये म्युझिक शो आर्टिस्ट बॅनोटो रिबेलो (वय-62) हे सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला मशीद येथे एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी आरोपी मुलीला दत्तक घेतले होते. या तरुणीचे तिच्या पेक्षा 3 वर्षे वयाने लहान असलेल्या मुलाशी प्रेमसंबंध होते. त्याला बॅनोटो यांचा विरोध होता. त्यात बॅनोटो यांनी संपत्ती आपल्याला मिळावी, यासाठी तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची हत्या करण्याचा कट रचला.

इतर बातम्या - CAA Protest: जामिया, AMUमध्ये हिंसाचारानंतर तणाव; या शहरांत प्रवेश बंद

दोघांनी बॅनोटो यांची राहत्या घरी हत्या केली. बांबू आणि चाकूने मारहाण करुन ही हत्या करण्यात आली. बॅनोटो रिबेलो हे मरत नसल्याने त्याच्या तोंडावर हिट स्प्रे मारण्यात आला. एवढेच नाही तर त्यांच्या मृत शरीराचे तीन भागात तुकडे केले. ते वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून तिन्हीही सुटकेस मिठी नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यातील एक सुटकेस पोलिसांना माहिम दर्ग्याच्या मागे समुद्रात सापडली. त्यात पोलिसांनी एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांग सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली.

इतर बातम्या - भर उत्सवात फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, एका तरुणीचा मृत्यू 5 जण गंभीर

अशी सुटली 'मर्डर मिस्ट्री'

या प्रकरणी माहिम पोलिसांच्या अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या हत्येचा तपास गुन्हे शाखा कक्ष क्रं.5 कडे सोपवण्यात आला. पोलिसांना समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयवांसोबत एक शर्ट, पॅंट होती. शर्टच्या कॉलरवर 'अल्मो' टेलरचे लेबल होते. 'अल्मो' टेलर हा कुर्ला (पश्चिम) येथील बेलग्रामी रोडवर आहे. पोलिसांनी तिथे चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली. या कामात पोलिसांनी फेसबुकचीही मदत घेतली. नंतर पोलिसांनी बॅनोटो यांच्या दत्तक मुलीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रिया रिबेलो आणि तिच्या सोळा वर्षीय प्रियकराने गुन्हा कबूल केला.

इतर बातम्या - दिल्ली, यूपीनंतर मुंबईतूनही निषेध सुरू, TISSमध्ये विद्यार्थ्यांकडून बहिष्कार

Published by: Renuka Dhaybar
First published: December 16, 2019, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading