अजमल कसाब उत्तर प्रदेशातला रहिवासी..!

अजमल कसाब उत्तर प्रदेशातला रहिवासी..!

मुंबई हल्ल्यातील आतंकवादी अजमल कसाब हा उत्तर प्रदेशातल्या औरैया जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं जात-रहिवासी प्रमाणपत्र समोर आल्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : मुंबई हल्ल्यातील आतंकवादी अजमल कसाब हा उत्तर प्रदेशातल्या औरैया जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं जात-रहिवासी प्रमाणपत्र समोर आल्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या प्रमाणपत्राने अधिकाऱ्यांची झोप उडवली असून, ते तयार करणाऱ्या संबंधित लिपीकास तात्काळ बडतर्फ करण्यात आलंय. तर, ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं असून, ते तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्याच आता शोध घेतला जातोय.

'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण औरैया जिल्ह्यातील बिधून तहसील येथलं आहे. कसाबच्या नावानं तयार करण्यात आलेल्या या जात-रहिवासी प्रमाणपत्रावर त्याची जन्मतारीख 21 ऑक्टोबर 2018 अशी नोंदविण्यात आली असून, त्याच जन्मस्थळ अंबेडकरनगर असं दर्शविण्यात आलंय.

या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर थोडेफार पैसे देऊन उत्तर प्रदेशाती सरकारी कार्यालयांमध्ये कोणतंही प्रमाणपत्र केलं जाऊ शकतं यावर शिक्कामोर्तब झालंय. 26/11 रोजी मुंबईत झालेल्या आतंकी हल्ल्यात अजमल कसाबला जीवंत पकडण्यात आलं होतं.

कोण हाता अजमल कसाब?

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सहायक उप निरीक्षक तुकाराम यांनी आतंकवादी अजमल कसाबला जीवंत पकडणार तेव्हढ्यात कसाबनं तुकाराम यांच्वर गोल झाडली आणि पळ काढला. यात तुकाराम हे शहीद झाले होते. ज्या ठिकाणी कसाब पकडल्या गेला होता त्या ठिकाणी तुकाराम यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचा पूतळा उभारण्यात आला आहे

4 वर्षानंतर झाली कसाबला फाशी

26/11 च्या हल्ल्यातील दोषी अजमल आमिर कसाब याला 22 नवंबर 2012 रोजी पुण्याच्या यरवडा कारागृहात फांसी देण्यात आली. 'ऑपरेशन बुद्धा स्‍माइल' यांतर्गत अजमल कसाबला फाशी देण्यात आली होती. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव त्याच कारागृहात दफन करण्यात आलं.

 VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात

First published: November 18, 2018, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading