मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून आईवर राग, 7 वीच्या मुलीची आत्महत्या

मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून आईवर राग, 7 वीच्या मुलीची आत्महत्या

विशेष म्हणजे, मोबाईलवर गेम खेळत म्हणून आई रागावली आणि या रागात मुलगी घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शोधून घरी आणलं होतं.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : सध्या गेम्सचा जमाना आहे असं म्हटलं तर तुम्हाला वेगळं वाटायला नको. कारण, मोबाईलवर गेम्स खेळणं हे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं झालं नाही. याचं जीवंत उदाहरण म्हणजे आईने मोबाईलमध्ये गेम खेळू दिला नाही म्हणून एका सातवीतल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या सांताक्रुजमध्ये घडला आहे.

विशेष म्हणजे, मोबाईलवर गेम खेळत म्हणून आई रागावली आणि या रागात मुलगी घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शोधून घरी आणलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुलीने घरात स्वत:ला गळफास लावून घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावंडांसोहत मोबाईलवर गेम खेळत असल्यामुळे आईने हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्याच्या रागात मुलीने घर सोडलं. तिची खूप वेळ शोधाशोध करून तिला पालकांनी घरी आणलं आणि तिची समजूत काढली.

त्याच्याच दुसऱ्या दिवशी मुलीने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकार वाकोल्यातील रावळपाडा परिसरात घडला आहे. पोलिसांनी सध्या तरी या प्रकरणात आत्महत्यी मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

Pulwama Attack : 'आज तो रिअल PUBG हो गया', शहीद जवानांबद्दल विद्यार्थ्यांची वादग्रस्त पोस्ट!

मात्र, या प्रकरणाचा सांताक्रुज पोलीस कसून तपास करत आहे. मुलीच्या अशा आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलिसांनी मुलीच्या घराचीदेखील झडती घेतली आहे.

दरम्यान, आपली जीव इतका स्वस्त नाही ती तो एखाद्या मोबाईल गेमसाठी व्यर्थ घालवावा. आईने गेम खेळू दिला नाही म्हणून मुलीनी एवढं टोकाचं पाऊल उचललं. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

हल्लीच्या मुलांना राग आवरता येत नाही. त्यांना ओरडलेलं चालत नाही. त्यामुळे आपल्या मुलांना कशी वळणं लावायची यासाठी पालकांनी आता जागृकता दाखवणं गरजेचं आहे. तर घरातली अशी तरुण मुलगी गमावल्यामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातून यावर शोक व्यक्त केला जात आहे.

LIVE VIDEO : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकलाही भरेल धडकी

First published: February 16, 2019, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading