मुंबईत काळीजाचं पाणी करणारी घटना, 5 वर्षाच्या मुलीवर अपहरणानंतर बलात्कार आणि हत्या

मुंबईत काळीजाचं पाणी करणारी घटना, 5 वर्षाच्या मुलीवर अपहरणानंतर बलात्कार आणि हत्या

या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 फेब्रुवारी : सध्या स्त्रीसाठी कोणतंही शहर सुरक्षित नाही आहे हेच खरं. कारण मुंबईसारख्या शहरांमध्ये आता मुलींवर अत्याचार होण्याची संख्या वाढली आहे. आताची बातमीदेखील अशीच काळजात घर करणारी आहे. मुंबईतल्या माहिममध्ये 5 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माहिमच्या एलजे रोड परिसरात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर 2 दिवसांनी त्याच परिसरात तिचा मृतदेह आढळल्याने माहिमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही मुलगी गुरुवारी रात्री तिच्या कुटुंबीयांसोबत झोपली होती. लोकांची मजूरी करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी सकाळी पाहिलं असता ही चिमुरडी घरात नव्हती. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेच्या 2 दिवसानंतर एलजे रोड परिसरातच वर्दळ नसलेल्या परिसरात या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या केली असं अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे माहिम परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मुलीच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टनंतर या प्रकरणातले महत्त्वाचे धागेदोरे समोर येतील असं पोलिसांचं म्हणणं आहे.

वास्तविक पाहता, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बलात्कार आणि हत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच पण त्यामुळे आताची तरुणाई गुन्ह्यांच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यामुळे हे सगळं आटोक्यात आणण्याचं काम सगळ्याच पालकांनी आणि पोलिसांनी केलं पाहिजे.

SPECIAL REPORT : 'मम्मीने जलाया', चिमुरडीला आईने दिले मेणबत्तीचे चटके

First published: February 8, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या