मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

PUBG च्या नादात 16 वर्षीय मुलाने गमावले 10 लाख रुपये, नैराश्यात उचललं मोठं पाऊल

PUBG च्या नादात 16 वर्षीय मुलाने गमावले 10 लाख रुपये, नैराश्यात उचललं मोठं पाऊल

गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : भारतात पबजी गेमची (PUBG Game) जबरदस्त क्रेझ आहे. या गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकी मोठी रक्कम, पैसे ट्रान्सफर झाल्याचं समजल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला. परंतु मुंबई क्राईम ब्रांचच्या मुस्कान यूनिटला मुलगा घरापासून काही अंतरावर आढळला. त्यानंतर त्याला ठाण्यात नेऊन त्याचं काउंसलिंग करण्यात आलं. मुंबई क्राईम ब्रांचने घरातून पळून गेलेल्या या मुलाला ट्रेस केलं आणि शोधून काढलं. आता त्याला कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने PUBG/BGMI चा गेमिंग आयडी, गेमर टॅग खरेदी करण्यासाठी आई-वडिलांच्या अकाउंटमधून 10 लाख रुपये ट्रान्सफर केले. या पैशांचा उपयोग PUBG Mobile च्या इन-गेम करन्सी म्हणजेच UC खरेदीसाठी केला गेला. रिपोर्टनुसार, मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं, की घरातून पळून जाण्याआधी त्याने घरात एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने घर सोडण्याबाबत आणि परत कधीही न येण्याबाबत लिहिलं होतं.

मुलाचे आई-वडील गेमच्या नादात अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केल्यामुळे बुधवारी 25 ऑगस्ट रोजी त्याला ओरडले होते. आई-वडिलांच्या ओरडण्यामुळे त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्राईम ब्रांचने CCTV फुटेजच्या मदतीने त्याला ट्रेस केलं आणि शोधून काढलं.

तुमच्या सोबत Online Fraud झालाय? बँक या परिस्थितीत देईल नुकसान भरपाई

मुंबईतील अंधेरी भागात राहणारा हा मुलगा होता. आई-वडिलांनी मुलगा घरातून पळून गेल्यानंतर त्याच्या जवळच्या मित्रांकडे, परिसरातील मित्रांकडे चौकशी केली. परंतु तो कुठेही सापडला नसल्याने आई-वडिलांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं.

दरम्यान, याआधीही PUBG सारख्या ऑनलाईन गेमच्या नादात अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक संस्थांनी ऑनलाईन गेम बॅन करण्याची मागणीही केली आहे. ऑनलाईन गेममुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे मोबाईल फोन दिल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

First published: