मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून संजय देशमुख अखेर बडतर्फ

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून संजय देशमुख अखेर बडतर्फ

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आलीय. राज्यपाल के विद्यासागर राव यांनीच त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढलेत.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आलीय. राज्यपाल के विद्यासागर राव यांनीच त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढलेत. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन निकालात आणि पेपरतपासणीत प्रचंड दिरंगाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आलीय. निम्मं शैक्षणिक वर्ष संपतं आलं तरीही मुंबई विद्यापीठाच्या सर्व शाखांचे निकाल अजूनही लागू शकलेले नाहीत.

या ऑनलाईन पेपर तपासणीतल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या निकाल दिरंगाईमुळेच संजय देशमुख यांना मध्यंतरी सक्तीच्या रजेवरही पाठवलं होतं. आता तर त्यांना थेट कुलगुरूपदावरून बडतर्फ करण्यात आलंय. कुलगुरूपदाचा कार्यकाल हा सर्वसाधारणपणे 5 वर्षांचा असतो. पण संजय देशमुखांना अवघ्या 2 वर्षातच बडतर्फ व्हावं लागलंय. बडतर्फीची कारवाई झालेले देशमुख हे कदाचित पहिले कुलगुरू असावेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 08:40 PM IST

ताज्या बातम्या