दाट धुक्यामुळे नाशिक-कल्याण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

दाट धुक्यामुळे नाशिक-कल्याण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

कल्याण - नाशिक रेल्वेमार्गावर आज सकाळी आसनगावाजवळ दाट धुकं पडल्याने काही काळा रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती, अशातच रेल्वे प्रशासनाने गाड्या सोडताना लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकल प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकावर संतप्त होत रास्तारोको केला होता.

  • Share this:

09 डिसेंबर, मुंबई : कल्याण - नाशिक रेल्वेमार्गावर आज सकाळी आसनगावाजवळ दाट धुकं पडल्याने काही काळा रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती, अशातच रेल्वे प्रशासनाने गाड्या सोडताना लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकल प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकावर संतप्त होत रास्तारोको केला होता.

या रेलरोकोमुळे जवळपास तासभर 5 रेल्वेगाड्या एकापाठोपाठ खोळंबल्याने दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर सकाळी 8.27 वाजता मुंबईकडे पहिली लोकल सोडल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी रास्तारोको मागे घेतला. आता या मार्गावरची रेल्वेसेवा सुरू झाली असली तरी बहुतांश गाड्या किमान 40 मिनिटे उशिराने धावताहेत. दरम्यान, मुंबईमध्येही आज सकाळी दाट धुकं पडल्याचं बघायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 09:55 AM IST

ताज्या बातम्या