अपत्यांची आपत्ती माझ्यावर नको,राज ठाकरेंच्या संभाजी भिडेंना टोला

अपत्यांची आपत्ती माझ्यावर नको,राज ठाकरेंच्या संभाजी भिडेंना टोला

नाटकं चांगली द्या...नाटक मोठं करा...नाटक वाढवा..त्याला एक भव्यता येऊ दे, संहिता येऊ दे अशी मागणीही राज ठाकरे यांनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून नाट्यकर्मींना हात जोडून केली.

  • Share this:

मुंबई, 13 जून : आंबा या विषयावर आज बोललेलं नको, उगाच अपत्यांची आपत्ती माझ्यावर नको असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजी भिडेंना टोला लगावला.

मुलुंडमध्ये 98 वं आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच नाट्यसंमेलनाला हजेरी लावली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पहिल्यांदा नाट्यसंमेलनाला बोलवण्याचा उल्लेख केला. शरद पवार आणि मी आज पुन्हा एकाच व्यासपीठावर आलो हा काही योगायोग नाही. आम्हाला दोघांना भाजपनं एकत्र आणलं असं म्हणत राज ठाकरेंनी विनोद तावडेंना टोला लगावला.

कोकणात गेल्यावर कोकणी माणसाला आंब्याबद्दल विचारलं तर काय नाय मोहर जळला असं उत्तर देतात. हा जो मोहर जळलेला असतो मग आंबा काय आभाळातून पडतो?, आज आंबा या विषयावर बोललेलं नको, उगाच अपत्यांची अापत्ती माझ्यावर नको असा टोला लगावत राज ठाकरेंनी आज रेखाटलेल्या व्यंगचित्राबद्दल सांगितलं.  आजच एक व्यंगचित्र केलंय. त्यामध्ये एक बाई  मुलाला घेऊन येते त्या मुलाचा चेहराच आंबा दाखवलाय. समोरची बाई विचारते काय भिडेंचा आंबा आहे का ? असं म्हणताच सभागृहात एकच हश्या पिकली.

हेही वाचा - माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान

हेही वाचा - भिडे गुरुजींवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा,अंनिसची मागणी

'तारखा विकून पोट भरतात हे चुकीचं'

नाट्यक्षेत्रात चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत. त्या थांबवल्या पाहिजे.  नाट्यक्षेत्रामध्ये ज्या काही तारखा असता त्या विकण्यासाठी कंपन्या काढतात. नाटक विकून पोट भरण्यापेक्षा तारखा विकून पोट भरतात हे चुकीचं आहे अशी नाराजी राज ठाकरेंनी व्यक्त केली.

'नाटक मोठं करा,नाटक वाढवा'

तसंच नाट्यगृहातील बाथरूम किती खराब आहे. यापेक्षा नाटकाची गोष्ट प्रेक्षकाला हवी आहे. नाट्यगृह आधुनिक व्हायला हवी, लोकांना आझ व्हिजुअॅली जे दिसतंय ते हवं आहे. उद्या तिकीटांचे दर वाढवले तरी चालेल. पण नाटकं चांगली द्या...नाटक मोठं करा...नाटक वाढवा..त्याला एक भव्यता येऊ दे, संहिता येऊ दे अशी मागणीही राज ठाकरे यांनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून नाट्यकर्मींना हात जोडून केली.

First published: June 13, 2018, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading