S M L

मुलुंडमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला, खा. सोमय्यांचा जखमीसोबत सेल्फी !

बईच्या मुलुंडमध्ये बिबट्याने ३ जणांवर हल्ला केलाय. मुलुंडमधल्या नाणेपाडा परिसरातली ही घटना आहे. मुलुंड परिसरात दोन बिबटे आढळून आलेत. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, मुलुंडमध्ये जखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी चक्क जखमींबरोबर सेल्फी काढलेत.

Chandrakant Funde | Updated On: Jan 13, 2018 10:55 AM IST

मुलुंडमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला, खा. सोमय्यांचा जखमीसोबत सेल्फी !

13 जानेवारी, मुंबई : मुंबईच्या मुलुंडमध्ये बिबट्याने ३ जणांवर हल्ला केलाय. मुलुंडमधल्या नाणेपाडा परिसरातली ही घटना आहे. मुलुंड परिसरात दोन बिबटे आढळून आलेत. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा मध्यरात्री एका इमारतीत घुसला होता. त्यावेळी हा प्रकार घडलाय. पोलीस, वनाधिकाऱ्यांकडून बिबट्याच्या शोध सुरू आहे. शेजारच्या बोरीवली नॅशनल पार्कमधून हे बिबटे नागरी वस्तीत घुसतात. यापूर्वीही भांडूप परिसरात बिबटे आढळून आलेत.

दरम्यान, मुलुंडमध्ये जखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी चक्क जखमींबरोबर सेल्फी काढलेत.. लोक जखमी झालेत, अशा वेळी सेल्फी काढू नये, इतकी साधी गोष्ट खासदाराला कळत नाही का, हा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 10:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close