मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Share Market : 8 रुपयांचा शेअर देतोय 6 पट जास्त रिटर्न, तुमच्याकडे असेल तर व्हाल मालामाल!

Share Market : 8 रुपयांचा शेअर देतोय 6 पट जास्त रिटर्न, तुमच्याकडे असेल तर व्हाल मालामाल!

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिलेत. तुमच्याकडे जर हा स्टॉक असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिलेत. मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत,ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठी कमाई करुन दिली आहे. या यादीत आता ‘विडली रेस्टॉरंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरचे नाव जोडलं गेलंय. कारण या कंपनीच्या शेअरने जबरदस्त रिटर्न दिला आहे. केवळ 52 कोटींचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

मंगळवारी (27 सप्टेंबर 2022) विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा शेअर बीएसईवर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटनंतर 48.55 रुपयांवर बंद झाला. या स्टॉकमध्ये काल सुमारे साडेनऊ हजार शेअर्सचे व्हॉल्यूम होते.

सहा वर्षांत झाले 1 लाखाचे 6 लाख

सहा वर्षांपूर्वी विडली रेस्टॉरंटच्या शेअरची किंमत सुमारे 8.13 रुपये होती. आता या शेअरची किंमत 48.55 रुपये आहे. याचाच अर्थ, गेल्या सहा वर्षांत या स्टॉकने सुमारे 497 टक्के रिटर्न दिलाय. एखाद्या गुंतवणूकदाराने फेब्रुवारी 2016 मध्ये या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असतील, तर त्याच्या 1 लाखाचे आज 5.97 लाख झाले आहेत.

हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न

गेल्या पाच वर्षांचा विचार केला, तर शेअर बाजारात या स्टॉकने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकवेळ तर हा स्टॉक 10.90 टक्क्यांनी कमी झाला होता. परंतु, गेल्या तीन वर्षांत पुन्हा तो वाढला आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी या शेअरची किंमत 8.13 रुपये होती, आणि आता सध्याची किंमत 48.55 रुपये आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर तुम्हाला आता 5.96 लाख रिटर्न मिळाले असते. याशिवाय, एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 5.30 लाख रिटर्न मिळाला. कारण 1 ऑक्टोबर 2021 रोजी या स्टॉकची किंमत 9.16 वर होती.

व्हीआयटीएससीमॅट्स ग्रुपची उपकंपनी

विडली ग्रुप ही व्हीआयटीएससीमॅट्स ग्रुपची एक उपकंपनी आहे. ही कंपनी खाद्य पदार्थ्यांचा व्यवसाय करते. विडली ग्रुपमध्ये डायन इन, क्युएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट), किऑस्क, क्लाउड किचन, पॅक केलेले स्नॅक्स आणि फूड्स यासह अनेक खाद्य ब्रँड समाविष्ट आहेत.

Share Market : ग्लोबल मार्केटमधील स्थितीमुळे वाढलं टेन्शन, भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम

दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र योग्य स्टॉक निवडणं मोठं कठीण काम आहे; पण असे काही स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत मोठी कमाई करुन दिली आहे. विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा हा शेअरदेखील तसाच ठरला आहे.

First published:

Tags: Money, Stock Markets