मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मल्टीव्हिटॅमिनची औषधं बंद होणार? DCGI कडून शिफारशीला स्थगिती

मल्टीव्हिटॅमिनची औषधं बंद होणार? DCGI कडून शिफारशीला स्थगिती

 कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) अर्थात देशातल्या औषधांच्या वापराला परवानगी देणाऱ्या सर्वोच्च संस्थेने मल्टिव्हिटॅमिन आणि मल्टिमिनरल्स असलेल्या औषधांवरची बंदी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. फिक्स डोस मेडिसीनवर (FDCs) बंदी घालण्याची प्रा. कोकाटे समितीची शिफारस मान्य करण्याचा निर्णय बोर्डाच्या सदस्यांनी घेतला आहे.

ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी बोर्ड अर्थात औषधविषयक तांत्रिक सल्लागार मंडळाने या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत या बाबीवर एकमत झालं, की एफडीसी अंतर्गत येणाऱ्या 14 औषधांवर बंदी घालण्यात यावी. ती बंदी अंमलात आली, तर कोडिन आधारित कफ सायरप्सवर बंदी येऊ शकते. त्यात टॉसेक्स, अ‍ॅस्कोरिल आणि फॅन्सीडील टी अशा औषधांचा समावेश आहे.

(खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव? WHOच्या दाव्याने खळबळ)

दरम्यान, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सवर आधारिक कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर बंदी घालण्याची समितीची शिफारस मात्र बोर्डाने तूर्तास स्थगित केली आहे. प्रा. कोकाटे समितीची ही शिफारस तर्कहीन असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे. याचाच अर्थ असा, की मल्टिव्हिटॅमिन आणि मल्टिमिनरल्सच्या गोळ्या-औषधांवर बोर्डाकडून बंदी घातली जाणार नाही. यापूर्वी मल्टिव्हिटॅमिन बनवणाऱ्या कंपन्यांना शो-कॉज नोटीसही पाठवण्यात आली होती; मात्र मल्टिव्हिटॅमिन औषधांवर बंदी घालण्याची खरंच गरज आहे का?

काही रुग्णांना नितांत गरज

नवी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल मेडिसीनचे सह-अध्यक्ष डॉ. अतुल कक्कर यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'आपल्या देशात बहुतांश नागरिकांच्या शरीरात व्हिटॅमिन्सचा खूप अभाव आहे. खासकरून व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी या जीवनसत्त्वांची कमतरता मोठ्या प्रमाणावर असते. म्हणूनच आपल्या देशातल्या नागरिकांना मल्टिव्हिटॅमिन औषधांची खरंच गरज आहे. त्या औषधांवर बंदी घालणं तार्किक नाही. काही रुग्णांना प्रत्येक व्हिटॅमिनच्या वेगवेगळ्या गोळ्या किंवा औषधं दिली जातात. त्याव्यतिरिक्त ज्यांना नर्व्ह्जची समस्या आहे, त्यांनाही व्हिटॅमिन्सची औषधं दिली जातात; मात्र काही रुग्णांना मल्टिव्हिटॅमिनची औषधंच द्यावी लागतात.'

(Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका)

डॉ. कक्कर म्हणाले, 'प्रशिक्षित डॉक्टर्स मल्टिव्हिटॅमिन्सचा वापर केवळ विशिष्ट रुग्णांच्या बाबतीतच करतात; मात्र त्या रुग्णांसाठी मल्टिव्हिटॅमिन्स किंवा मल्टिमिनरल्सची औषधं आवश्यकच असतात. टीबीचे रुग्ण, अल्कोहोलिक पेशंट्स, तसंच नर्व्ह्जच्या समस्या असलेल्या रुग्णांना मल्टिव्हिटॅमिन्सची औषधं दिली जातात.'

त्यामुळे अशा विशिष्ट रुग्णांसाठी मल्टिव्हिटॅमिन-मल्टिमिनरल औषधांची गरज पडत असल्याने त्यांच्यावर बंदी घालणं योग्य नाही, असा तज्ज्ञांचा सूर आहे.

First published: