Home /News /news /

धोनीनं झाडं लावण्याचा संदेश दिल्यानंतर नेटीझन्स नाराज, म्हणाले...

धोनीनं झाडं लावण्याचा संदेश दिल्यानंतर नेटीझन्स नाराज, म्हणाले...

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) झाडं लावण्याचा विधायक संदेश दिल्यानंतरही त्याच्यावर सोशल मीडियातून (Social Media) टीका होत आहे.

    मुंबई, 26 जून :  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागच्या वर्षीच निवृत्त झाला आहे. आता तो फक्त आयपीएल स्पर्धेत क्रिकेट खेळतो. धोनी निवृत्त झाला असला तरी त्याचे फॅन्स प्रचंड आहेत. तो जे काही करतो त्याकडं त्याच्या फॅन्सचं लक्ष असतं. धोनी सध्या शिमलामध्ये (Shimla) कुटुंबासोबत सुट्ट्या घालवत आहे. याल सुट्टीच्या दरम्यान धोनीचा लाल रंगातील शर्टमधील एक फोटो व्हायरल (Viral) झाला आहे. धोनी याममध्ये नव्या लुकमध्ये आहे. धोनीनं या फोटोमध्ये 'झाडं लावा आणि जंगल वाचवा' असा मेसेज दिला आहे. धोनी कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धोनीनं झाडं लावण्याचा विधायक संदेश दिल्यानंतरही त्याच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे. धोनीनं कापलेल्या लाकडावर लिहेला हा संदेश शेअर केल्याच्या वस्तुस्थितीकडं नेटीझन्सनं लक्ष वेधलं आहे. WTC Final मधील जखमेनंतर न्यूझीलंडचे मलम, भारतीय फॅन्सना दिली Good News सोशल मीडियावर धोनी कृती वादग्रस्त ठरली आहे. पण धोनीच्या सीएसके टीमनं या आयपीएलमधील कामगिरीनं सर्वांनाच प्रभावत केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सीएसकेनं सातपैकी पाच सामने जिंकले होते. सध्या पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेकडून आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धात विजेतेपद पटकावण्याची अपेक्षा धोनीच्या फॅन्सची आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: MS Dhoni, Photo viral, Social media, Tweet

    पुढील बातम्या