• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मिसेस फडणवीसांचा पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; जनतेलाच विचारलं 'पहचान कौन?'

मिसेस फडणवीसांचा पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; जनतेलाच विचारलं 'पहचान कौन?'

मिसेस फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 एप्रिल : भाजपकडून या ना त्या प्रकारे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील काही मागे नाहीत. त्यादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार राज्य सरकारवर त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असल्याचं पाहायला मिळतं. मिसेस फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Mrs Fadnavis attacks Thackeray government again) अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये एक कोडं घातलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया या टीकात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: