एमपीएससी प्रवेश प्रक्रियेला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

एमपीएससी प्रवेश प्रक्रियेला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय.

  • Share this:

17 जानेवारी, मुंबई : महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलीय. आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. मागसवर्गीय कोट्यातल्या विद्यार्थिनीनं गुणवत्तेच्या आधारवर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल तर त्याला प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जात असा आरोप मुंडे यांनी याचिकेतून केला आहे.

हायकोर्टानं या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुणवत्तेच्या आधरावर जर एखादा परिक्षार्थी खुल्या वर्गातील जागेवर अर्ज दाखल करत असेल तर त्याला अपात्र का ठरवलं जातंय असा सवाल हायकोर्टानं केलाय.

यासंदर्भात हायकोर्टानं याआधीच आदेश दिलेले असतानाही जर राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नसेल तर हा कोर्टाच्या आदेशांचा अवमान असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय.

दरम्यान राज्य सरकारला यासंदर्भात सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी १ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करत पुढील सुनावणीपर्यंत एमपीएसची संपूर्ण उमेदवार निवड प्रक्रिया स्थगित केलीय. मागासवर्गीय कोट्यातील जागा मर्यादित झाल्याने अलिकडच्या काळात मागासवर्गीयांमधली अनेक गुणवंत मुलं आता खुल्या गटातून उमेदवारी अर्ज भरू लागलीत. त्यातूनच हा वाद उत्पन्न झाल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2018 01:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading