• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • MPSC ला आला पाकिस्तानचा पुळका, विचारला हा प्रश्न

MPSC ला आला पाकिस्तानचा पुळका, विचारला हा प्रश्न

भारताने पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एअर स्ट्राईक केलं. सर्वच स्तरातून पाकिस्तानाचा निषेध होत असताना महाराष्ट्रात मात्र रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेगळाच वाद निर्माण केला आहे

 • Share this:
  ठाणे, 24 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर जगभर पाकिस्तान आणि भारतातील संबंधांवरून वातावरण तापलं आहे. त्यात आता महराष्ट्र लोकसेवा आयोगाने अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी एमपीएससीच्या प्रश्न पत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता मनसेनंही प्रश्नावर कडक पवित्रा घेतला आहे. भारताने पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एअर स्ट्राईक केलं. सर्वच स्तरातून पाकिस्तानाचा निषेध होत असताना महाराष्ट्रात मात्र रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेगळाच वाद निर्माण केला आहे. 'फेब्रुवारी 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याचं निधन झालं ?' असा प्रश्न एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आला आहे. या प्रश्नामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असा सूर आता पुढे येत आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिद कुटुंबीयांच्या तसंच भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचं ठाण्यातील स्वप्नील पाटील या विद्यार्थाने सोशल मीडियावर म्हटलं आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्न पत्रिकेत पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्याचं निधन हा प्रश्न कोणत्या आधारे घेण्यात आला होता याचा खुलासा एमपीएससी बोर्डाने करावा अशा मागणी स्वप्नील पाटीलने केली आहे. तर हा प्रकार कळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याचा निषेध करत या प्रश्नाचे विद्यार्थ्यांना मार्क द्यावे आणि पुन्हा पाकिस्तान संबंधीत प्रश्न विचारून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका अन्यथा मनसे स्टाईल निषेध केला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदिप पाचंगे यांनी दिला आहे. VIDEO: वाळूच्या ढिगाराखाली दबल्याने दोन युवकांचा मृत्यू
  First published: