नवी दिल्ली, 29 जून : भारत आणि चीन यांच्यात 15 ते 16 जून दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर (30 जून) मंगळवारी दोन्ही देशांमधील कमांडर स्तरावर (Corps Commander Level) चर्चा होणार आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले तर चीनचेही नुकसान झाले.
दोन्ही देशांमधील तिसर्या फेरीतील चर्चा यावेळी भारतीय हद्दीत असेल. 22 जून रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरी चीनच्या काही भागातील नियंत्रण रेषेशेजारील चुशुलमध्ये (Chushul) पार पडली होती.
हे वाचा-Corona Effect : बिग स्टार्सचे हे 7 चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
6 जून रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत दोन्ही पक्षांनी बर्याच बाबतील माघार घेण्याचे मान्य केले आणि भारताने 4 मेपूर्वी चीनला एलएसीच्या सैन्य दलात परत येण्यास सांगितले होते. गेल्या महिन्यापासून दोन्ही देशाच्या सीमेवर सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. यंदा प्रत्यक्ष चर्चा नियंत्रण रेषेवरील भारतीय हद्दीतील चुशुलमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी चीनच्या चुशुल भागातील मोल्डो येथे दोन्ही बैठका घेतल्या गेल्या. या चर्चेचा अजेंडा दोन्ही देशांनी तयार केलेल्या मागे जाण्याचा प्रस्तार समोर ठेवण्याचा आहे, असेही सूत्रांनी सांगितले. सध्याच्या तणावाच सर्व क्षेत्रातील परिस्थिती स्थिर करण्यासाठी चर्चा होणार आहे.
शेवटची बैठक 11 तास चालली
22 जून रोजी भारतीय आणि चिनी सैन्य प्रतिनिधी यांच्यात सुमारे 11 तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चर्चा सौहार्दपूर्ण, सकारात्मक आणि रचनात्मक वातावरणात पार पडली असून माघार घेण्याबाबत परस्पर करार झाला. भारतीय लष्कराने नंतर म्हटले आहे की, पूर्व लडाखमधील सर्व विभागातील विस्थापनाच्या पद्धतींबद्दल चर्चा करण्यात आली.
संपादन - मीनल गांगुर्डे