मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, 700 कोटींच्या योजना मंजूर

मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, 700 कोटींच्या योजना मंजूर

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची पंतप्रधान आरोग्य विमा योजना राज्यात एकत्रितपणे राबविली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई 15 जानेवारी : राज्यावर दुष्काळाचं सावट असलं तरी निवडणुका जवळ आल्याने घोषणांचा सुकाळ दिसतोय. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत तब्बल 700 कोटींच्या विविध योजनांना मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. यात ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजासाठी  विविध योजनांचा समावेश आहे.

समाजातल्या विविध घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या आधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर केंद्राने खुल्या गटातल्या गरीब लोकांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे ओबीसी नाराज झाल्याचं लक्षात आल्याने आता ओबीसींसाठी नव्या योजनांना मंजूरी दिली.

मंत्रिमंडळाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची पंतप्रधान आरोग्य विमा योजना राज्यात एकत्रितपणे राबविली जाणार आहे. यात रुग्णांना ५ लाखांपर्यंत नि:शुल्क उपचार मिळणार मिळणार आहेत. यात आधीपेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आलाय.

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर

ओबीसी महामंडळाला २५० कोटींची मदत

भटक्या -विमुक्त महामंडळाला  300 कोटी

तर पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज

Special Report : शिवसेनेनं मुंबईकरांचे हाल 'करून दाखवले'!

First published: January 15, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading