गुजरातमध्ये भाजप पराभूत होणार- खा. संजय काकडे

गुजरातमध्ये भाजप पराभूत होणार- खा. संजय काकडे

गुजरातमध्ये भाजपच जिंकणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलवाल्यांनी वर्तवला असला तरी भाजपचेच खासदार संजय काकडे यांनी मात्र, गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं भाकित वर्तवलंय. विशेष म्हणजे पुणे महापालिकामध्ये संजय काकडे यांनी वर्तवलेलं भाकित शंभर टक्के खरं ठरलं होतं. म्हणूनच संजय काकडे यांनी वर्तवलेल्या अंदाजाला महत्व प्राप्त झालंय.

  • Share this:

16 डिसेंबर, पुणे : गुजरातमध्ये भाजपच जिंकणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलवाल्यांनी वर्तवला असला तरी भाजपचेच खासदार संजय काकडे यांनी मात्र, गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं भाकित वर्तवलंय. विशेष म्हणजे पुणे महापालिकामध्ये संजय काकडे यांनी वर्तवलेलं भाकित शंभर टक्के खरं ठरलं होतं. म्हणूनच संजय काकडे यांनी वर्तवलेल्या अंदाजाला महत्व प्राप्त झालंय.

संजय काकडे म्हणाले, '' गुजरात मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही, काँग्रेसच सरकार बनवेल, तिथं 22 वर्षांच्या सत्तेमुळे भाजपच्या विरोधात अॅन्टीइन्कबन्सी तयार झाली होती. मुस्लिम, पाटीदार, दलित हे प्रमुख समाज काँग्रेससोबत गेलेत. आनंदीबेन , रूपानी यांनी काहीच काम केलं नाही त्यामुळे गुजरातमध्ये भाजप जिंकलंच तर तो फक्त आणि फक्त मोदींचा करिश्मा असेल, आणि मोदी हे नेहरू-गांधी यांच्यापेक्षा मोठे नेते ठरतील पण तसं होणार नाही, मी वस्तुस्थिती मांडतोय, माझा हा अंदाज मी सर्वेक्षण करूनच व्यक्त केलाय. त्यात कुठेही पक्ष विरोध नाही, किंवा मी पक्षावर नाराजही नाही, पण वस्तुस्थिती मांडणे म्हणजे पक्षाशी गद्दारी नाही,''

गुजरातमध्ये गेल्या तीन वर्षापासून मोदींएवढा सक्षम नेता मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाला मिळू शकलेला नाही. ज्या प्रकारे हार्दिक पटेलची 'सेक्स सीडी' आली तेही चुकीचं होतं. तसंच निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान विकासाचा मुद्दा प्रमुख बनलाच नाही. या सर्व मुद्द्यांचा विचार करता आपण काही जणांना सर्वेक्षणासाठी पाठवलं होतं. भाजपला निवडणुकीत पराभवाचा धक्का बसेल असं सर्वेक्षणातून निष्पन्न होतंय, असं संजय काकडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...