शिवरायांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

शिवरायांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

सार्वजनिक ठिकाणी वास्तूंना नाव देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जातोय. हे थांबवण्यासाठी संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. आता मराठा आंदोलक आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जात आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मुख्यमंत्र्यांकडे याबद्दल मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी टि्वट करून दोन नव्या मागण्या केल्या आहे.  मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी वास्तूंना नाव देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जातोय. हे थांबवण्यासाठी संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.

शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. " आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकरण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन् बिनशर्त माफी मागावी" अशी मागणी त्यांनी केली होती.

राष्ट्रवादीचीही मागणी

दरम्यान, भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मंत्रालयावर मोर्च्याचा इशारा

तर दुसरीकडे पर्यावरण रक्षणासाठी झगडणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. मात्र, आता त्यांनी  भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनासह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत; अन्यथा, येत्या 17 डिसेंबर रोजी मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांनी दिला आहे.

 

&nbs

Published by: sachin Salve
First published: December 4, 2019, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading