Home /News /news /

मेळघाटात राणा दाम्पत्याची विना मास्क क्रिकेट मॅच; कोरोना नियम धाब्यावर

मेळघाटात राणा दाम्पत्याची विना मास्क क्रिकेट मॅच; कोरोना नियम धाब्यावर

Corona in Amravati: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet kaur Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मेळघाटात जावून आदीवासी बांधवांसोबत जल्लोषात होळी (Holi) साजरी केली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना विषाणूचे नियम धाब्यावर बसवले होते.

पुढे वाचा ...
    अमरावती, 28 मार्च: सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic)मोठ्या प्रमाणात पसरत आहे. देशात सर्वात जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण असणाऱ्या पहिल्या 10 शहारांमध्ये महाराष्ट्रातील 9 शहरांचा समावेश आहे. यावरून महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूचा अंदाज बांधला जाऊ शकतो. अशातच आज होळी (Holi) निमित्त अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन (Corona rules Break) केलं आहे. अशातचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet kaur Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी कोरोना विषाणू संबंधित नियम धाब्यावर बसवून जल्लोषात होळी साजरी केली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम केवळ सामान्यांनाच आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी मेळघाट या ठिकाणी गेले आहेत. अशा पद्धतीनं होळी साजरी करण्याची राणा दाम्पत्यांची ही 11 वी वेळ आहे. गेल्या 11 वर्षांपासून खासदार नवनीत  राणा व आमदार रवी राणा हे मेळघाटात आदिवासी समुदायासोबत होळी साजरी करतात. यावर्षीही त्यांनी त्यांची परंपरा कायम राखली आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. कोरोना नियमांची आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं होतं. पण राणा दाम्पत्यांनी आज मेळघाटातील आदिवासी गावात बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला आहे. यावेळी राणा दाम्पत्यांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा स्पष्टपणे विसर पडल्याचं दिसलं. यावेळी दोघांनीही मास्क परिधान केला नव्हता तर सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडवला होता. हे ही वाचा - नागपूरकरांच्या चिंतेत वाढ; सलग सहाव्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा 3000 पार यावेळी नवनीत राणा यांच्या गोलंदाजीवर आमदार रवी राणा यांनी मनसोक्त बॅटींग केली, तर नवनीत राणा यांनी जोरदार फटकेबाजी केली. पण दुसरीकडे जिल्हात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांना राणा दाम्पत्यांची कृती टीकेची धनी ठरत आहे. त्यामुळे देशात कोरोना नियम  फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amravati, Corona spread, Navneet Rana, Ravi rana

    पुढील बातम्या