'बंडखोर' खासदार नाना पटोलेंची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दांडी !

'बंडखोर' खासदार नाना पटोलेंची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दांडी !

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी राज्यातले सर्व खासदार झाडून दिल्लीत हजर असताना, थेट मोंदीवर टीका करून प्रकाशझोतात आलेले गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मात्र, या बैठकीला दांडी मारणंच पसंत केलंय. मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीत जाऊ शकलो नाही, असं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेबर : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी राज्यातले सर्व खासदार झाडून दिल्लीत हजर असताना, थेट मोंदीवर टीका करून प्रकाशझोतात आलेले गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मात्र, या बैठकीला दांडी मारणंच पसंत केलंय. मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीत जाऊ शकलो नाही, असं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर पक्षावर नाराज आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून त्यांनी मध्यंतरी थेट मुख्यमंत्र्यांवरही टीका केली होती. एवढंच नाहीतर ओबीसींच्या प्रश्नावरून त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाही प्रश्न विचारला होता. त्यावर मोदी त्यांच्यावरच चिडले होते. तेव्हापासून नाना पटोले आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यात दुरावा निर्माण झालाय. अनेक वेळा त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणावरही जाहीरपणे टीकाही केलीय.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी, पक्षाकडून जेव्हा विचारणा होईल तेव्हा उत्तर देऊ, असं त्रोटक उत्तर दिलंय. यावरून नाना पेटोले बंडाच्या पावित्र्यावर कायम असल्याचेच स्पष्ट होतंय.

First published: September 25, 2017, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading