मध्य प्रदेशात मुलांना आता अंडी नाही तर मिळणार गायीचे दूध, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मध्य प्रदेशात मुलांना आता अंडी नाही तर मिळणार गायीचे दूध, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मात्र कट्टर शाकाहारी लोकांकडून अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने ही गायीच्या दुधात असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे अंड चांगलं की दूध हा यावर कायम वाद विवाद घडत असतात.

  • Share this:

भोपाळ 22 नोव्हेंबर: मध्य प्रदेशात गायींसाठी खास मंत्रालय स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण (Shivraj Singh Chouhan) यांनी नवी घोषणा केली आहे. राज्यातल्या कुपोषित मुलांना आता अंडी (Eggs) नाही तर गायीचं दूध (Cow milk) देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. त्याच बरोबर गायींसाठी 2 हजार नवे निवारे बांधण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात 7 ते 8 लाख बेवारस गायी आहेत. हे सगळेच निवारे काही सरकार चालवणार नाही. मात्र स्वयंसेवी संस्थानच्या मदतीने हे निवारे चालविण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यांमध्ये गो शाळेच्या निर्मितीचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसचे कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्यांनीही गोशाळेंची निर्मिती केली होती. शेती आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा, कृषी संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

भाजपच्या अजेंड्यावर कायमच गाय हा विषय असून केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर गो रक्षक आणि गो संरक्षणावरून प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. सर्व देशभरच गो हत्याबंदी असावी असाही भाजपचा कायम आग्रह राहिला आहे. भाजप गायीचंही राजकारण करत असल्याची टीका कमलनाथ यांनी केली आहे.

अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असल्याने मुलांना अंडी खायला देण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. तुलनेनं अंड स्वस्त असल्याने त्याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र कट्टर शाकाहारी लोकांकडून अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने ही गायीच्या दुधात असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे अंड चांगलं की दूध हा यावर कायम वाद विवाद घडत असतात.

मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे आता त्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 22, 2020, 9:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या