गौतम गंभीर यांना परदेशातून आली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

गौतम गंभीर यांना परदेशातून आली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतात. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गंभीर यांनी राजकारणात प्रवेश केला. एवढेच नाही तर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी विजयही मिळवला. मात्र खासदार झाल्यानंतर दिल्ली प्रदुषण आणि आता नागरिक सुधारण कायद्यावरून गंभीर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता गंभीर यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

खासदार गौतम गंभीर यांनी शहादारा जिल्हयातील पोलिस अधिक्षक यांना पत्र लिहिले आहे. यात गंभीर यांनी, “मला आणि माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबबात मी तक्रार नोंदवली आहे. तरी माझी सुरक्षा वाढवण्यात यावी”, अशी मागणी केली आहे.

गंभीरचे क्रिकेट करिअर

गौतम गंभीरने भारतीय संघासाठी 58 कसोटी सामने, 147 एकदिवसीय सामने आणि 37 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 58 कसोटींमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4 हजार 154 धावा केल्या आहेत. त्याने 147 एकदिवसीय सामन्यात 39.68 च्या सरासरीने 5 हजार 238 धावा केल्या आहेत. गंभीरनं 37 टी -20 सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. त्याने विश्वचषक 2011मध्ये भारतीय संघासाठी 122 चेंडूंत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 2011 वर्ल्ड कप जिंकला. मात्र गंभीरनं 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या