हा तर क्रिमिनल हलगर्जीपणा, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा सरकारवर निशाणा

नारायणगाव येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार डॉ.अमोल कोल्हे भावुक झाले. त्याचं कारणही तसंच होतं... दोन दिवसांपूर्वी महापुरात मृत झालेल्या आई आणि मुलाचा 'तो' फोटो खासदार कोल्हे यांनी दु:ख व्यक्त केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 08:45 PM IST

हा तर क्रिमिनल हलगर्जीपणा, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा सरकारवर निशाणा

रायचंद शिंदे (प्रतिनिधी)

नारायणगाव, 9 ऑगस्ट- नारायणगाव येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार डॉ.अमोल कोल्हे भावुक झाले. त्याचं कारणही तसंच होतं... दोन दिवसांपूर्वी महापुरात मृत झालेल्या आई आणि मुलाचा 'तो' फोटो खासदार कोल्हे यांनी दु:ख व्यक्त केले. दुसरीकडे, चार दिवसानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात पोहोचत नसतील आणि इतर मंत्रीही त्याच वेळी पोहोचत असतील तर खरोखर हा क्रिमिनल हलगर्जीपणा आहे, असं म्हणावं लागेल, असा थेट हल्ला चढवला डॉ.अमोल कोल्हे केला. मंत्र्यांना परिस्थितीचं गांभीर्य नसेल तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी भाजप सरकारवर लगावला आहे.

शुक्रवारी दुपारी डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा थांबवत कोल्हापूर, सांगलीकडे प्रस्थान केले. त्याआधी त्यांच्या मूळ जन्मगावी नारायणगाव (ता.जुन्नर) इथे 'एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठ' असं त्यांनी आवाहन केलं. यामध्ये हजारो भाकरी आणि चटणी जमा करण्यात आल्या.जगाला कोणतीही कृती करायला सांगण्याआगोदर ती कृती मात्र स्वतः करावी. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिनेभिनेते आणि शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे. आज कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील पूस्थिती पाहताना काळजाला खूप मोठी ठेच पोहोचते. या महाप्रलयी पूरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच भाग , गावे, शहरे तुडुंब पाण्याखाली गेली असून तिथे सध्या काय परिस्थिती असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. ना जेवणासाठी अन्न, ना राहण्यासाठी घर सगळं काही उद्धवस्त झाले आहे. अशा या भयावह संकटातून मार्गक्रमण करत असलेल्या नागरिकांना गरज आहे ती 'माणुसकीच्या आधाराची'. डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या 'शिवस्वराज्य' यात्रेस गुरूवारी बागलाण येथील सभेमध्ये स्थगिती दिली. शुक्रवारी सकाळी आपल्या नारायणगावात दाखल झाले. आपल्या मतदारसंघातील लोकांना आवाहन केले की 'एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठी' अशा मथळ्याखाली आपल्या सोशल माध्यमातून आवाहन केले आणि त्या आवाहनास जनतेने उत्तम प्रतिसाद दिला."असं म्हणतातना कोणत्याही कार्याची सुरुवात स्वत:पासून केली तरच ते कार्यसिद्धीस जात" आपल्या उपक्रमाची सुरवात त्यांनी घरापासून केली डॉ.अमोल कोल्हे यांचे निवासस्थान असलेल्या कोल्हेमळ्यात सर्व माता-भगिणी एकत्र येऊन भाकरी थापण्यास सुरवात झाली. डॉ.अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सांगत नाहीत तर ते स्वताच्या आयुष्यात तसे वागतात याचा प्रत्यय आज आला, नुसतं बोलण्यापेक्षा किंवा आवाहन करण्यापेक्षा आयुष्यात कृती महत्वाची असते.

VIDEO:महापुराचं भयावह दृश्य, मुक्या जनावरांचा ठिकठिकाणी खच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...