• होम
  • व्हिडिओ
  • रेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये!
  • रेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये!

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 09:30 PM IST | Updated On: Feb 23, 2019 09:30 PM IST

    होशंगाबाद, विवेक त्रिवेदी, 23 फेब्रुवारी : पत्नीचा मृतदेह, सायकलवरून, खांद्यावरून नेल्याचा, आईचा मृतदेह बाईकवरून नेल्याचा किंवा रूग्णालयानं अॅम्ब्युलन्स देण्यास नकार दिल्याच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपण पाहिल्या आणि वाचल्या देखील आहेत. सरकारी गलथानपणाचा अनेकांना फटका देखील बसला आहे. पण, या साऱ्या गोष्टी असताना देखील मध्य प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबलनं रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी जवळपास 1.5 किमी पायपीट करून प्रवाशाला जीवदान दिलं आहे. पुनम भिल्लोरे असं या पोलीस कॉन्टेबलचं नाव असून अजित असं या जखमी तरूणाचं नाव आहे. पुनम यांनी दाखवलेल्या धैर्यपणाबद्दल त्यांच्यावर आता कौतुकांचा वर्षाव होतोय. जखमी प्रवाशाला रूग्णालयामध्ये नेण्यासाठी रस्ताच नाही ही बाब पुनम यांच्या ध्यानात आली. त्यानंतर त्यानी क्षणाचाही विलंब न लावला जखमी तरूणाला खांद्यावरून रूग्णालयामध्ये दाखल केले. परिणामी प्रवाशाचे प्राण वाचले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी