ज्यांनी 30 वर्षे पक्षासाठी काम केलं त्यांनाच पक्षात जागा नाही, या नेत्याचा खडसेंना टोला

ज्यांनी 30 वर्षे पक्षासाठी काम केलं त्यांनाच पक्षात जागा नाही, या नेत्याचा खडसेंना टोला

खडसेंनी गेली 30 वर्षे सर्व पदे आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न चालवल्याने सामान्य कार्यकर्त्याकरता केवळ सतरंज्या उचलण्याची काम करत राहिला...

  • Share this:

इम्तियाज अहमद,(प्रतिनिधी)

भुसावळ, 17 ऑक्टोबर: मुक्ताईनगर मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी खडसेंच्या 'पिच' जोरदार बॅटिंग केली. बोदवड येथे जाहीर सभेत खासदार कोल्हे यांनी भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ज्यांनी 30 वर्षे पक्षासाठी काम केलं त्यांनाच पक्षात जागा नाही तर त्यांच्या वारसाला पक्ष काय जागा देणार, असा सवाल एकनाथ खडसेंचे नाव न घेता केला.

खडसे यांच्या परिवाराने गेली 30 वर्षे सर्व पदे आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न चालवल्याने सर्व सामान्य कार्यकर्त्याकरता केवळ सतरंज्या उचलण्याची काम करत राहिल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी सावदा येथे झालेल्या सभेत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना खासदार कोल्हे यांनी म्हटलं की, खडसे यांच्या विकास काम न करण्याच्या कामाच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी आवाज उठवल्याने त्यांना आज हे गुंड म्हणत आहेत. मात्र, अशा प्रकारचे गुंड जर चंद्रकांत पाटील असतील ते आम्हाला हवेच आहेत. त्यांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

शेतकरी कर्ज माफीवर भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अटी शर्ती घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार कोल्हे यांनी म्हटलं की, मौका सबको मिलता है. आज ते मत मागायला तुमच्याकडे येतील. तेव्हा तुम्हीही त्यांना तशाच पद्धतीने अटी शर्ती घालायला हव्यात, अस म्हटले आहे. खासदार कोल्हे यांना ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती.

VIDEO:सावरकरांना भारतरत्नच्या मागणीवर मनमोहन सिंग म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 09:55 PM IST

ताज्या बातम्या