इराणचा टॉप कमांडर सुलेमानी आणि भारताचं 'असं' होतं कनेक्शन अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणच्या लष्कराचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला. त्यानंतर अमेरिका-इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे सुलेमानीचा भारतात झालेल्या कारवायांमध्ये हात असल्याचा दावा शनिवारी केला होता. मात्र, त्यांच्या दाव्याच्या अगदी विरुद्ध सुलेमानींनी अनेकदा भारताची बाजू घेतल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. कूलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तान सरकारने जेव्हा इराणच्या सरकारवर आरोप केला होता. त्यात म्हटलं होतं की, पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी भारताकडून इराणच्या भूमीचा वापर केला जात आहे. तेव्हा जनरल सुलेमानी यांनी पाकिस्तानचा आरोप फेटाळून लावला होता आणि कुलभूषण प्रकऱणी भारताला मदत केली होती. सुलेमानी यांची भारत-इराण यांच्यातील चाहाबार पोर्ट करारामध्येही महत्वाची भूमिका होती. सुलेमानी यांच्यावर हल्ल्यानंतर भारतात कारगिल आणि लखनऊ इथ शिया समुदायाने निषेध नोंदवला आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, कासिम सुलेमानी यांनी नवी दिल्ली ते लंडनपर्यंत हल्ल्याचा कट रचला होता. सुलेमानींच्या कटानुसार ट्रम्प यांनी भारताचा थेट उल्लेख केला नाही. मात्र 2012 मध्ये दिल्लीत इस्रायलच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्याच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा संबंध याच्याशी जोडला गेला. कारला मॅग्नेट लावून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. जनरल सुलेमानीच्या हत्येनंतर इराणने अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जनरल कासिम सुलेमानीला गुप्त कारवायांसाठी ओळखलं जात होतं. 2006 मधील इस्रायल हिजबुल्लाह युद्धात सुलेमानीने लेबनानमध्ये नेतृत्व केलं होतं. सिरियातील संघर्षातही इराणने हस्तक्षेप केला होता. यात जनरल सुलेमानीने महत्वाची भूमिका पार पाडली होती.Mourners dead in stampede at Iran's senior commander Qassem Suleimani's funeral, reports AFP News Agency
— ANI (@ANI) January 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.