Motorolaच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Motorolaच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

मोटोरोलाचा 'हा' स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइट प्रोग्रामचाच एक भाग असल्याने, आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड पाय आणि अँड्रॉइड क्यू या दोन्ही प्रणालींना तो सपोर्ट करतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : Motorola कंपनीने Motorola One Vision हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ब्राझीलमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनच्या रियरमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा तर सेल्फीसाठी पंट होल डिस्प्ले देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर glass gradient असलेल्या या स्मार्टफोनचची किंमत जवळपास 23,000 रुपये आहे. मोटोरोलाचा 'हा' स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइट प्रोग्रामचाच एक भाग असल्याने, आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड पाय आणि अँड्रॉइड क्यू या दोन्ही प्रणालींना तो सपोर्ट करतो.

Flipkart वर Big Shopping Days Sale सुरू; बम्पर डिस्काउंटमुळे अर्ध्या किमतीत मिळतील 'या' वस्तू

अशी आहेत फीचर्स -

Motorola One Vision या स्मार्टफोनला 6.3 इंचाचा Full HD डिस्प्ले असून त्यात सॅमसंगचा Exynos 9609 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 4GB RAM आणि 128 GB चं इनबिल्ट स्टोअरेज असून, मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने तुम्ही ते 512GB पर्यंत वाढवू शकता.

Google च्या स्मार्टफोनवर 21000 ची सूट; 'हा' ठरणार सर्वात स्वस्त गुगल फोन

कॅमेरा आहे खास -

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनचं प्रमुख वैशिष्ट्य हे त्याच्या कॅमेऱ्यात आहे. ड्युएल रियर कॅमेरा सेटअप मधील प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा तर सेकंडरी कॅमेर 5 मेगापिक्सलाच आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये सॅमसंगचे सेंसर वापरण्यात आले आहेत. तसंच सेल्फीसाठी या फोनमध्ये 25 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन टाइप सी युएसबी केबल, फिंगरप्रिंट सेंसर आणि टर्बो चार्जिंगला सपोर्ट करणारी 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

 

First published: May 16, 2019, 2:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading