मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सव्वा लाखाचा फोल्डेबल मोबाइल भारतात लाँच, स्मार्टफोनमध्ये आहेत 'ही' फीचर्स

सव्वा लाखाचा फोल्डेबल मोबाइल भारतात लाँच, स्मार्टफोनमध्ये आहेत 'ही' फीचर्स

सव्वा लाख रुपये इतकी किंमत असलेला फोल्डेबल स्मार्टफोेन मोटोरोलाने भारतात लाँच केला असून 2 एप्रिलपासून बूकिंग करता येणार आहे.

सव्वा लाख रुपये इतकी किंमत असलेला फोल्डेबल स्मार्टफोेन मोटोरोलाने भारतात लाँच केला असून 2 एप्रिलपासून बूकिंग करता येणार आहे.

सव्वा लाख रुपये इतकी किंमत असलेला फोल्डेबल स्मार्टफोेन मोटोरोलाने भारतात लाँच केला असून 2 एप्रिलपासून बूकिंग करता येणार आहे.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 19 मार्च : मोटोरोलाने भारतात फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटो रेझर असं या फोनचं नाव आहे. याची किंमत 1 लाख 25 हजार रुपये असल्यानं यामध्ये काय फीचर्स असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. फोनचे प्री-बुकींग सुरू झाले आहे. बाजारात 2 एप्रिलपासून हा फोन उपलब्ध होईल. याआधी अमेरिकेत मोटो रेझर लाँच झाला आहे. अमेरिकेत याची किंमत 1500 डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख 11 हजार रुपये इतकी आहे.

कंपनीने या फोनवर अनेक ऑफऱ दिल्या आहेत. सिटी बँक आणि जिओची यामध्ये पार्टनरशिप आहे. ग्राहकांना सिटी बँकेच्या कार्डवरून 10 हजार रुपयांची कॅशबॅक मिळत आहे. जिओकडून ग्राहकांना डबल डेटा आणि डबल व्हॅलिडीटी ऑफर मिळणार आहे.

मोटो रेझरमध्ये एक  6.2 इंच फोल्डेबल P-OLED  आणि एक 2.1 इंच G-OLED स्क्रीन आहे. यात 6.2 इंचाची स्क्रीन रेग्युलर असून फोन फोल्ड केल्यानंतर बाहेरच्या बाजुस लहान स्क्रीन दिसते. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710SoC  प्रोसेसर आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी आहे. फोल्डेबल फोन असून कंपनीच्या जुन्याच फ्लिप फोनच्या डिझाइनवर आधारीत आहे.

हे वाचा : फोनचं चार्जिंग लवकर संपतं? बॅटरी वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. अँड्रॉइड पाय 9 आउट ऑफ द बॉक्स व्हर्जनवर काम करतो. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून 16 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल इंटरनल कॅमेरा आहे.

बॅटरीची क्षमता 2510mAh  असून 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. एकदा चार्जिंग केल्यानंतर दिवसभर बॅटरी चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीबीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप सी असे कनेक्टीव्हीटीचे पर्याय आहेत.

हे वाचा : इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

First published:

Tags: Motorola