आईची फ्लाइट सुटू नये म्हणून लेकाचा प्रताप, Indigo ला फोन करून सांगितलं 'विमानात आहे बॉम्ब'

आईची फ्लाइट सुटू नये म्हणून लेकाचा प्रताप, Indigo ला फोन करून सांगितलं 'विमानात आहे बॉम्ब'

दिल्ली विमानतळावर, जेव्हा प्रवासी दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बसले होते, तेव्हा कोणीतरी फोन करून सांगितलं की, विमानात बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : हल्लीची मुलं काय करतील याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. दिल्ली विमानतळावर, जेव्हा प्रवासी दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बसले होते, तेव्हा कोणीतरी फोन करून सांगितलं की, विमानात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. विमानाची तपासणी केली असता काहीही आढळलं नाही. पण विमानात बॉम्ब असल्याचं समजल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.

संपूर्ण विमानाची तपासणी झाल्यानंतर हाती काहीच लागलं नाही तेव्हा प्रवाशांच्या जीवात जीव आला. विमानात बॉम्ब असल्याची माहिती देणाऱ्या नंबर तपासला असता हा फेक कॉल असल्याचं समोर आलं. अधिक तपास केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. बॉम्ब असल्याची खोटी माहिती का दिली अशी चौकशी केली असता आरोपीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.

इतर बातम्या - हिंगणघाटनंतर औरंगाबादही हादरलं, घरात घुसून बिअर बार चालकानं महिलेला पेटवलं

दिल्ली विमानतळ T-1 येथून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात दोन महिला उशीरा आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. चौकशी दरम्यान या महिलांनी सांगितले की, त्यांनी मुंबईत राहणाऱ्या मुलगा केशवला उड्डाण घेण्यास उशीर झाल्याची माहिती दिली होती. त्या महिलांनी सांगितले की, केशवने त्यांना सांगितले की तुम्ही विमानतळावर आरामात जा तुमची फ्लाइट चुकणार नाही. कॉल सेंटरवर कॉल करून तपास पथकाला हा मोबाइल नंबर सापडला तेव्हा तो केशवचा मोबाइल नंबर असल्याचे समजले.

इतर बातम्या - आशिष शेलारांविरोधात शिवसेना आक्रमक, रात्रीच मुंबईत लावले वादग्रस्त होर्डिंग

आयजीआय विमानतळ डीसीपी संजय भाटिया यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी 7:38 वाजता इंडीगो येथील गुडगाव येथील कस्टमर केअरवर विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. तपास केल्यानंतर आरोपीचा शोध लागला आहे. आरोपी केशवला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.

इतर बातम्या - निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्यात विलंब का? कोण घालतंय त्यांना पाठिशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2020 09:10 AM IST

ताज्या बातम्या