VIDEO : आईचं स्वप्न पूर्ण केलं पण ती नाही; एका टीव्ही शोमध्ये सुशांत आठवणीने होता गहिवरला

VIDEO : आईचं स्वप्न पूर्ण केलं पण ती नाही; एका टीव्ही शोमध्ये सुशांत आठवणीने होता गहिवरला

या व्हिडीओमध्ये त्याने एका गाण्यावर नृत्य केलं आहे. हे गाणं आईला समर्पित करीत असल्याचे तो सांगत आहे

  • Share this:

मुंबई, 14 जून : सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह याने आज गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला इतके तास उलटून गेल्यानंतर अद्यापही तो आपल्यात नाही ही बाब चाहत्यांना सहन होत नाही. तो गेल्या काही काळापासून नैराश्यात होता. नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे त्याला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं? हा प्रश्न गेल्या अनेक तासांपासून चाहत्यांना सतावत आहे.

सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळ होता. अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर त्याने आयुष्यात खूप नाव व पैसा कमावला मात्र ते पाहायला त्याची आई नव्हती. सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट पाहून तो आईच्या किती जवळ होता हे लक्षात येईल.

विजैता सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये 2011 म्हणजेच 9 वर्षांपूर्वी सुशांतही झलक दिखला जा या टिव्ही शोमध्ये आपल्या आईच्या आठवणीत एक नृत्य सादर केलं होतं. त्या काही मिनिटांच्या सादरीकरणातून तो प्रत्येक क्षणाला तिची किती आठवण काढतो हे दिसून येतं. त्याच्या सादरीकरणानंतर अख्ख्या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं. आई जवळ असते तेव्हा तिचं महत्त कळत नाही मात्र ती आपल्यापासून लांब गेल्यावर ती कायम आठवत राहतं. आईसाठी समर्पित केलेले हे नृत्य पाहताना तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हे वाचा-अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुसाईड, पोलिस इन्व्हेस्टिगेशनमध्ये झाला मोठा खुलासा

 

 

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: June 14, 2020, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading