पोलीस अधिकाऱ्याचा हा फोटो तुमचं ह्रदय जिंकून घेईल!

पोलीस अधिकाऱ्याचा हा फोटो तुमचं ह्रदय जिंकून घेईल!

तब्बल दोन तास तो पोलीस अधिकारी त्या बाळाला खेळवत राहिला आणि त्या बाळाची आईच झाला.

  • Share this:

मेहेबूबनगर,ता. 30 सप्टेंबर : पोलीस म्हटलं की लोकांना भीती वाटते. पोलीस स्टेशनची पायरी ओलांडायची म्हटलं तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. 'पोलिसी खाक्या' हा शब्दही वाईट अर्थानेच वापरला जातो. लोकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या खाकी वर्दीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र सर्वांची मनं जिंकून घेतलीय. तेलंगणातल्या मेहबूबनगर इथल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा लहान बाळाला खेळवत असतानाचा एक फोटो सध्या व्हायरल झाला असून त्याचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

करड्या शिस्तीच्या पोलिसांना काहीही दया-माया नसते असा एक सार्वत्रिक समज आहे. पण या खाकी वर्दीतल्या पोलिसांच्या आत दडलेल्या माणसाचं दर्शन फार कमी वेळा होतं. अशीच ही घटना घडलीय मेहेबूबनगर शहरामध्ये. मेहेबूबनगर मधल्या एक ज्युनियर कॉलेज हे SCTPC परिक्षेचं एक सेंटर होतं. या सेंटरवर एक तरूणी परिक्षेसाठी आली होती. ती तरूणी होती एका लहान बाळाची आई.

घरचं सगळं सांभाळून ती आई आपल्या बाळाला घेऊन परिक्षा सेंटरवर आली होती. त्या बाळाला सांभाळायला कुणी तिच्या घरचं माणूसही येवू शकलं नाही. सेंटवर आई सोबत आलेलं ते बाळ तिथल्या गर्दीने भांबावून गेलं आणि रडू लागलं. त्या आईला बघून तिथे ड्युटीवर असलेला एक पोलीस कर्मचारी पुढं आला आणि त्या बाळाला मी सांभाळतो तुम्ही सावकाश परिक्षा द्या असं त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या आईला सांगितलं.

 

तब्बल दोन तास तो पोलीस अधिकारी त्या बाळाला खेळवत राहिला आणि त्या बाळाची आईच झाला. त्या पोलिसाच्या मायेने रडणारं बाळही शांत झालं. त्या बाळाला माया लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे मुजीब उर रेहमान. रेहमान हे मुसापेट पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत.

बाळाला खेळवत असलेल्या रेहेमान यांचा फोटो मेहेबूबनगरच्या पोलीस प्रमुख रिमा राजेश्वरी यांनी ट्विट करत आपल्या सहकाऱ्याच्या माणूसकीचं दर्शन जगाला घडवलं. नेटकऱ्यांनीही त्याला प्रचंड प्रतिसाद देत खाकी वर्दीतल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि हा फोटो पाहुन हजारो लोकांचं ह्रदयही भरून आलं.

First published: October 1, 2018, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading