Home /News /news /

माता न तू वैरिणी, आईने 6 महिन्याच्या बाळासह 2 मुलांचा घोटला गळा!

माता न तू वैरिणी, आईने 6 महिन्याच्या बाळासह 2 मुलांचा घोटला गळा!

या मातेनं तिन्ही मुलांचा गळा आणि नाक दाबून हत्या केली. यात सहा महिन्याचा बाळाचाही समावेश आहे.

    अमेरिका, 23 जानेवारी : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. परंतु, एका आईने माता न तू वैरिणी असल्याचं सिद्ध केलं आहे. या आईने आपल्या 6 महिन्याच्या बाळासह दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना अमेरिकेतील ओरिजोना राज्यात घडली आहे. या महिलेनं आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने आपल्या पोटच्या गोळ्यांचा खून केला. हे लहान चिमुरडे जीवाच्या आकांताने हातपाय मारत होते पण तरीही या मातेच्या काळजाला पाझर फुटला नाही. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हेनरी असं या महिलेचं नाव आहे. ती ड्रग्सच्या आहारी गेली होती. तिनेच पोलिसांना एक एक करून तिन्ही मुलांची हत्या केल्याची कबुली दिली. या मातेनं तिन्ही मुलांचा गळा आणि नाक दाबून हत्या केली. यात सहा महिन्याचा बाळाचाही समावेश आहे. हेनरीने आधी मुलांना बॉटलने दूध पाजले आणि त्यानंतर झोपी घातलं. त्याच वेळी तिने बाळाचा गळा दाबला आणि त्यांना ठार मारलं. तिन्ही मुलांची हत्या केल्यानंतर घरातील लिव्हिंग रूममधील सोफ्यावर त्यांचे मृतदेह ठेवले होते. घरात राहणाऱ्या इतर सदस्यांना  बऱ्याच वेळा झाला तरी मुलांचा आवाज काही ऐकू आला नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला आणि तिच्या रुममध्ये डोकावून पाहिलं. तेव्हा घडलेला प्रकार समोर आला. याबद्दल पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी खूनी मातेला ताब्यात घेतलं. घरातील सदस्याने सांगितलं की, हेनरी ही ड्रग्सच्या प्रचंड आहारी गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती विचित्र पद्धतीने वागत होती. त्यावेळी ती आपल्या मुलांबद्दल पुटपुटत होती. पोलिसांसमोर हेनरीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसंच तिने कशा प्रकारे मुलांना मारलं याचा घटनाक्रमही सांगितला.  परंतु, तिने हे कृत्य का आणि कशासाठी केलं याबद्दल माहिती कळू शकली नाही. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या