Home /News /news /

ज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्याच गळ्यावर फिरवला सुरा, पतीच्या निधनानंतर केलं कृत्य

ज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्याच गळ्यावर फिरवला सुरा, पतीच्या निधनानंतर केलं कृत्य

जेव्हा मुलगा जमिनीवर कोसळला तेव्हा त्याने आरडाओरडा सुरू करताच निर्दयी आईने त्याच्या तोंडावर वीट मारुन ठार केलं.

    वाराणसी, 01 मार्च : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणार एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आईने स्वत:च्या मुलाची निघृण हत्या केली आहे. आईने आधी तिच्या 11 वर्षाच्या मुलाला अज्ञात जागेवर नेलं आणि नंतर त्याच्या मानेवर वार केले. जेव्हा मुलगा जमिनीवर कोसळला तेव्हा त्याने आरडाओरडा सुरू करताच निर्दयी आईने त्याच्या तोंडावर वीट मारुन ठार केलं. यानंतर त्याचा मृतदेह लगतच्या खड्ड्यात फेकून ती प्रियकरासह पळून गेली. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी सांगितलं की, 19 फेब्रुवारी रोजी रोहनियन भागात एका अज्ञात मृत अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 35 वर्षीय शांती देवी आणि तिचा प्रियकर विकास मोदनवाल उर्फ रसद याला अटक करण्यात आली आहे. गौरव अशी मृत मुलाची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षांचा विकास शांतीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. शांतीच्या पतीचं आधीच निधन झालं होतं. पतीची सर्व मालमत्ता ही मुलाच्या नावावर होती. यामुळे महिलेने तिच्या प्रियकरासमवेत हत्येचा कट रचला. त्यामुळे आईने काळजाच्या तुकड्याला ठार मारण्याचा प्लान केला. हे वाचा  - CAA Protest: शाहीन बागेत कलम 144 लागू, मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तैनात पोलीस चौकशीत आरोपी विकास आणि आरोपी महिला शांतीने गौरवची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. गौरवची हत्या केल्यानंतर त्याने भेलूपूरमध्ये गौरव बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. ते म्हणाले की, विकासने पोलिसांना सांगितले की शांती अनेक दिवसांपासून आपल्या मुलाची हत्या करण्याविषयी बोलत होती. कारण तिच्या नवऱ्याने मृत गौरवच्या नावावर मालमत्ता केली होती, त्यानंतर ती मालमत्ता शांतीदेवीकडे वळली असती. हे वाचा - फक्त 3 दिवसांसाठी मिळालं आईचं प्रेम, प्रसूतीनंतर ठाण्यात शिक्षक महिलेचा मृत्यू
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या