मातृत्वाला कलंक! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला आईनेच संपवलं

अनैतिक संबंधाच्या आड येत असल्यामुळे आईने मुलाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. गुंगीचं औषध पाजून आईने मुलाची हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 07:29 PM IST

मातृत्वाला कलंक! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला आईनेच संपवलं

सातारा, 08 मे : वडिल मुलांना मारायला लागले की मारू नका म्हणून मधे पडणारी आई आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण साताऱ्यात आईसारख्या श्रेष्ठ नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार साताऱ्याच्या वाईमध्ये समोर आला आहे.

अनैतिक संबंधाच्या आड येत असल्यामुळे आईने मुलाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. गुंगीचं औषध पाजून आईने मुलाची हत्या केली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आईचे एका व्यक्तिशी अनैतिक संबंध होते. त्याच्या आड येणाऱ्या मुलाला आईने संपवलं.

आईच्या अनैतिक संबंधाबद्दल मुलाला समजले. आपलं पितळं उघडं पडेल म्हणून आईने मुलाल गुंगीचं औषध दिलं. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : वरमाला घालतानाच नवरदेवाच्या वडिलांची हत्या, नवरीऐवजी मृतदेह घेऊन परतलं वऱ्हाड

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर तपासात अडथळा होऊ नये यासाठी माहिती गुप्त ठेवत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Loading...

पोलिसांनी घरातून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणात अधिक तपास करत आहेत. तर या प्रकरणात पोलीस शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

SPECIAL REPORT : नगरच्या 'सैराट'ची खरी कहाणी आणि काही अनुत्तरीत प्रश्न!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...