या कारणामुळे मुलीच्या LOVE STORY चा आईनेच केला 'दि एन्ड', जिवंत जाळून कायमचं संपवलं!

या कारणामुळे मुलीच्या LOVE STORY चा आईनेच केला 'दि एन्ड', जिवंत जाळून कायमचं संपवलं!

आईने घरातील रॉकेल तरुणीवर ओतून तिला पेटवलं आणि नंतर स्वत:लाही पेटवून घेतलं. याआधी दोघींमध्ये वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

चेन्नई, 21 नोव्हेंबर : जन्मदात्या आईने 17 वर्षीय मुलीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माय-लेकींमध्ये वाद झाला आणि मुलीने आईचं म्हणणं ऐकण्यास नकार दिल्यामुळे आईने रागाच्या भरात पोटच्या मुलीवर रॉकेल ओतलं आणि तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटना झाल्यानंतर गंभीर अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने घरातील रॉकेल तरुणीवर ओतून तिला पेटवलं आणि नंतर स्वत:लाही पेटवून घेतलं. याआधी दोघींमध्ये वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, आई नागपट्टिनम रुग्णालयात आयुष्याची झुंज देत आहे तर मंगळवारी रात्री उशिरा मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. तरुण आंतरजातीय असल्यामुळे आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आणि याच वादात आईने मुलीला जिवंत जाळ्याचा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात आलं आहे. शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय वर्षीय तरुणाने या प्रकरणात पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. 17 वर्षीय मृत तरुणी आणि शेजारी राहणाऱ्या तरुणाचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांना लग्न करायचं होतं. पण मुलीच्या आईने लग्नाला विरोध केला.

2016 पासून मृत तरुण आणि शेजारील तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीला माझ्यासोबत लग्न करायचं असल्यामुळे तिच्या आईने तिला जिवंत जाळलं असल्याचा दावा तरुणाने केला आहे. मृत तरुणी 11वीला असताना तिच्या आईने तिला कॉलेजमध्ये जाण्यास बंदी घातली. तीला आता 18वं वर्ष लागलं आहे. त्यामुळे ती आईकडे लग्नासाठी परवानगी मागण्यासाठी गेली आणि त्यांच्यात वाद झाला.

यावेळी दोघींमध्ये वाद झाला आणि पुढील घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने अद्याप आईविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नसून पोलीस आता मृत तरुणीच्या शेजाऱ्यांची चौकशी करणार आहेत. तर तरुणाच्या दाव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published: November 21, 2019, 5:13 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading