कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या अटकेमागील कहाणी...

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या अटकेमागील कहाणी...

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला 9 जानेवारी 2020 रोजी मुंबईच्या एक्स्टॉर्शन सेलने पाटणातून अटक केलं.

  • Share this:

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला 9 जानेवारी 2020 रोजी मुंबईच्या एक्स्टॉर्शन सेलने पाटणातून अटक केलं. एजाजवर 25 गुन्हे दाखल आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी तो पकडला जाणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र त्याला पकडणं इतकं सोपं नव्हतं. तब्बल 20 वर्षांपासून मुंबई पोलीस एजाजचा शोध घेत होते. मात्र त्यांच्याकडे एजाजचा एकच फोटो होता. तोदेखील 23 वर्षे जुना.

एजाजचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रथम त्याच्या मुलीला अटक केले. मात्र तिला अटक केल्यानंतरही पोलिसांना त्याचा नवीन फोटो मिळू शकला नव्हता. मात्र एजाजच्या मुलीने त्याच्याबद्दल काही महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या होत्या. केवळ त्या छोट्या छोट्या खुणांवरुन मुंबई पोलिसांनी एजाजला अटक केले. एजाज नेहमी काळ्या व तपकीरी रंगाचे महागडे जॅकेट घालायचा. शिवाय तो आपल्यासोबत नेहमी महागड्या सिगरेटचे (Marbolo) पॅकेट ठेवतो. या ब्रॅंड व्यतिरिक्त तो दुसरं सिगारेट पित नसल्याचे एजाजच्या मुलीने पोलिसांना सांगितले.

हिवाळा असो वा उन्हाळा...त्याच्या गळ्यात नेहमी स्कार्फ असतो. 2002 मध्ये बॅंकॉक हल्ल्यात एजाज जखमी झाला होता. तेव्हा त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्यांच्या खुणा होत्या. गळ्याभोवती असलेल्या या जखमा लपविण्यासाठी तो नेहमी स्कार्फ वापरत असे. मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम पाटनातील जक्कनपुर बस स्टॅंडवरील जॅकेट आणि स्कार्फचा वापर करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे ओळखपत्र मागितले. मात्र ते बनावटी होते. पोलिसांनी त्याचे छायाचित्र काढले आणि मुंबईतील अधिकाऱ्यांना पाठविले. त्यानंतर एजाजच्या मुलीने त्याची ओळख पटवली. मात्र अद्यापही पोलिसांना त्यांची ओळख नक्की करायची होती. त्यामुळे पोलिसांनी एजाजला अटक केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती व शरीरावरील बंदुकीचे व्रण तपासून पाहायचे होते. पोलिसांना तशा खुणाही सापडल्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी एजाजला पाटणाहून मुंबईला आणले. महागडी जॅकेट, महागडी सिगरेट आणि गळ्याभोवती बंदुकीचे व्रण पाहून पोलिसांनी एजाज लकडावालाची ओळख पटवली आणि त्याला पाटणा येथून अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 01:47 PM IST

ताज्या बातम्या