Home /News /news /

मुंबईतल्या कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या पोहोचली 5 हजारांवर, राज्यात आज उच्चांकी 6603 नवे रुग्ण

मुंबईतल्या कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या पोहोचली 5 हजारांवर, राज्यात आज उच्चांकी 6603 नवे रुग्ण

कोरोना टिपेवर असताना माध्यमांमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोक सुरक्षा नियमांचं पालन सक्तीने करत होते.

कोरोना टिपेवर असताना माध्यमांमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोक सुरक्षा नियमांचं पालन सक्तीने करत होते.

मुंबईत आज 62 जणांचा मृत्यू झाला. तर 13 47 जणांची वाढ झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 87856 वर गेली आहे.

    मुंबई 8 जुलै: कोरोनाचे धोका (Coronavirus) दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये उच्चांकी 6603 रुग्णांची (Covid-19 Patient ) भर पडली. तर 198 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 23 हजार 724वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे राजधानी मुंबईतल्या मृत्यूचा आकडा 5 हजारांच्या वर गेला असून आत्तापर्यंत 5064 जणांचा मृत्यू झाल्याने मुंबई हादरून गेली आहे. मुंबईत आज 62 जणांचा मृत्यू झाला. तर 13 47 जणांची वाढ झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 87856 वर गेली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रशासनही हादरलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. Lockdownमुळे दोन महिने घर होतं बंद, दार उघडताच त्या दोघांना पाहून मालक हादरला दरम्यान, कोरोनावर लवकरच औषध सापडलं नाही तर भारतात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. फेब्रुवारी 2021 पासून भारतात दररोज 2.87 लाखांच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येऊ शकतात असा रिपोर्ट जगविख्यात MIT (Massachusetts Institute of Technology)ने दिला आहे. जगभरातल्या 84 देशांच्या टेस्टिंग आणि कोरोना रुग्णांचा अभ्यास करून MITच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2021पासून भारतात दररोज तीन लाखांच्या जवळपास रुग्ण येऊ शकतात. असं झालं तर ते फार मोठं संकट असेल आणि जगात भारत सर्वाधिक रुग्णांचा देश बनेल असंह या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना टेस्ट, रिपोर्ट आल्यानंतर केलं महत्त्वाचं ट्वीट याच काळात अमेरिकेत दररोज 95,400, दक्षिण अफ्रीकेत 20,600, इराणमध्ये 17,000, इंडोनेशियात 13,200, ब्रिटनमध्ये 4200, नाइजेरियात 4000, तुर्कीमध्ये 4,000, फ्रांसमध्ये 3300 आणि जर्मनीत 3000 रुग्ण आढळून येऊ शकतात असंही या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या