Home /News /news /

Covid-19 in Babies and Kids:19 दिवसात 17, 533 मुलांना कोरोना! शाळा उघडताच आकडा वाढण्याची भीती

Covid-19 in Babies and Kids:19 दिवसात 17, 533 मुलांना कोरोना! शाळा उघडताच आकडा वाढण्याची भीती

Maharashtra Schools To Reopen On Monday: सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी Coronavirus चा बदललेला विषाणू लहान मुलांना लक्ष्य करत आहे. 1 ते 10 वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोना झाला आहे.

मुंबई, 20 जानेवारी: गेली दोन वर्षं बंद असलेली शाळेची दारं (Maharashtra Schools to reopen) कोरोनाची दुसरी भयंकर लाट (Coronavirus Second wave) ओसरल्यावर उघडली होती. पण डिसेंबर अखेर तिसऱ्या लाटेच्या तडाख्यात पुन्हा शाळा बंद झाल्या. आता सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education minister Maharashtra Varsha Gaikwad) यांनी जाहीर केला असला, तरी कोरोनाच्या दहशतीखालीच शाळा उघडणार हे निश्चित. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेत Coronavirus चा नवा variant Omicron लहान मुलांना लक्ष्य करत आहे. गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा उघडायचा निर्णय़ झाला असला, तरी शाळेत मुलांना पाठवायचं का याबाबत पालकांच्या मनात चलबिचल आहे. हे वाचा: सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे डिसेंबरमध्ये किलकिले झालेले शाळेचे दरवाजे मुलांची किलबिल आणि परीक्षांची धावपळ शिगेला पोचण्याआधीच पुन्हा बंद करावे लागले. Coronavirus च्या तिसऱ्या लाटेने मुंबई, पुण्यात धुमाकूळ घातला आणि Omicron variant च्या प्रसाराचा वेग पाहता रुग्णसंख्या भराभर वाढली. आता मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात दैनंदिन 20 हजारांवर नवे कोरोना रुग्ण दाखल होत होते. तो आकडा आता 6 हजारांवर आला आहे. त्याच वेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हे वाचा: कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा मुंबईत कोरोनाची आकडे कमी होत असले तरी पालक धास्तावले आहेत, हे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीसुद्धा मान्य केलं. शाळा उघडण्याच्या निर्णयावर त्या म्हणाल्या, "ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंय त्यांनी संमतीपत्र द्यावं."
First published:

Tags: Corona vaccine, Mumbai News, Varsha gaikwad

पुढील बातम्या